Ballarpur city@ news
• आम आदमी पार्टी, बल्लारपुर तर्फे शालेय पोषण आहार “स्वयंपाकी व मदतनीस” यांच्या समस्येबाबत गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन.
✍️ पारिश मेश्राम
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी,
बल्लारपुर: शहरातील शासकीय व निमशासकीय शाळेतील शालेय पोषण आहार स्वयंपाकी व मदतनीस यांना महाराष्ट्र शासनाने ठरविल्याप्रमाणे मानधन मिळत नसल्याची तक्रार आम आदमी पक्षाला शहारातील मदतनीस महिलांकडून मिळाली होती. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार या महिलांना महिन्याचे २५०० रू मानधन मिळायला पाहिजे होते, परंतु त्यांना फक्त १००० रूपयेच दिले जात आहे.
यामध्ये अधिकाऱ्यांकडून कंत्राटदारास अधिक फायदा पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे, असा संशय व्यक्त करत शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वात गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ज्यामध्ये या महिलांच्या संदर्भात ठोस पाऊले उचलून त्यांचे हक्क त्यांना मिळवून देण्याची मागणी करण्यात आली.
त्यांच्या हक्काचे २५०० रूपये तर मिळायला पाहिजे परंतु यासह गटशिक्षणाधिऱ्या नी वाढती महागाई पाहता हे मानधन दुप्पट करण्याची मागणी आपल्यापरीने शासनाकडे करावी हि मागणी देखील पक्षाने केली.
यावेळेस शहराध्यक्ष रवि पुप्पलवार, उपाध्यक्ष गणेश सिलगमवार, अफज़ल अली, सचिव ज्योतिताई बाबरे, सह सचिव आशिष गेडाम, प्रवक्ता आसिफ शेख, यूथ अध्यक्ष सागर कांबळे, शिरीन सिद्दीकी, महिला अध्यक्षा किरण खन्ना, उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी, सचिव शीतल झाड़े, स्मिता लोहकरे, डी के मेश्राम, स्वंयमपाकी व मदतनिस असंख्य महिला आणि इत्यादि उपस्थिति होते.


