Home Breaking News Ballarpur city@ news •वेकोलीच्या खाजगी वाहन चालकांचा आंदोलन यशस्वी

Ballarpur city@ news •वेकोलीच्या खाजगी वाहन चालकांचा आंदोलन यशस्वी

438

Ballarpur city@ news
•वेकोलीच्या खाजगी वाहन चालकांचा आंदोलन यशस्वी

बल्लारपूर :- राष्ट्रीय कोळसा खदान मजदुर संघ (इंटक) बल्लारपूर क्षेत्र द्वारे बल्लारपूर क्षेत्रात कार्यरत खाजगी वाहन चालक यांच्या समस्या घेऊन आर शंकरदास प्रादेशिक अध्यक्ष व प्रादेशिक सचिव विश्वास साळवे यांच्या नेतृत्वाखाली दि.01.09.2023 पासून बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व खाणीतील सर्व खाजगी वाहने बंद करून संप सुरू करण्यात आला. सलग 3 दिवस संप सुरू राहिल्यानंतर 03.09.2023 रोजी रात्री 8.00 वाजता क्षेत्रीय कार्यालयाच्या सभागृहात बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत जॉन वर्की महाव्यवस्थापक (संचालन), रामानुजम प्रादेशिक कार्मिक व्यवस्थापक, शैलेश माटे, उपव्यवस्थापक (कार्मिक), सिंह कर्मचारी अधिकारी (वी एव या),बल्लारपूर झोन आणि सर्व युनिटचे कार्मिक व्यवस्थापक उपस्थित होते. इंटक च्या वतीने आर. शंकरदास, विश्वास साळवे, बंडू लांडे, अनंता एकडे व गौतम कांबळे, कैलास आकापाका, अश्पाक हे खाजगी वाहनांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. खाजगी वाहन मालकाचे प्रतिनिधी म्हणून संजय कोपरकर, राजकुमार श्रीवास्तव, सिनु उपस्थित होते. वरील बैठकीत प्रदीर्घ चर्चेनंतर काही मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेत व्यवस्थापन व खाजगी वाहनधारकांनी सदर आंदोलन 10.10.2023 पर्यंत पुढे ढकलून दिनांक 04.09.2023 च्या पहिल्या शिफ्ट पासून काम सुरु करण्याचा निर्णय घेतला. सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी आर.एन सिंह, इलियास खान, सुदर्शन डोहे, सुरेश डाहुले, होमदेव चन्ने, बंडू लांडे, मोतीलाल वर्मा, विश्वजित सिंह, महाकाली राजम, सुरेश मूठठलकर, दिनेश रोगे, वसंता ताजने, आसिफ सय्यद, दिनकर वैद्य, अनंता एकडे, चुनबाद ठेंगर, विनोद कावळे सह संघटनेचे सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली तसेच बल्लारपूर परिसरात कार्यरत खासगी वाहन चालक गौतम कांबळे, कैलास आकापाका, अश्पाक, व इतर सर्व वाहनचालकांनी सक्रिय सहभाग घेऊन हे आंदोलन यशस्वी केले.