Home Breaking News •अश्विनी दीक्षित यांना कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार जाहीर!

•अश्विनी दीक्षित यांना कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार जाहीर!

193

•अश्विनी दीक्षित यांना कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार जाहीर!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत: उपसंपादक

पुणे:शिक्षक ध्येय, ज्ञानसंवाद,संत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था हिंगणघाट, नागपूर विभाग शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था चंद्रपूर ,निंभोरकर होमिओ फाॅर्मसी, अमरावती व वसुधा नाईक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर तालुका बारामती जिल्हा पुणे या विद्यालयाच्या सहशिक्षिका अश्विनी सुभाष दीक्षित यांना कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.गेली सहा वर्षापासून त्या या विद्यालयात कार्यरत आहे. कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारासाठी “अभिवाचन कट्टा:वाचू आनंदे” या नावाने त्यांनी आपला प्रस्ताव सादर केला होता. सदरहु उपक्रम त्या यावर्षी सतत तीन महिने राबवित आहे. कमी वेळात राज्यस्तरावर या उपक्रमाची दखल घेण्यात आली .त्याबद्दल एक वेगळे चैतन्य आणि ऊर्जा या उपक्रमाची सृजनशीलता वाढवण्याची जबाबदारी नक्कीच मी पूर्ण करीन अश्या अश्विनी दीक्षित म्हणाल्या .

“उपक्रमाचा उद्देश असा”
लॉकडॉऊन काळात मुलांचा स्क्रीनटाईम वाढला आणि मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, टॅबलेट्स आणि इतर गॅझेट्सची सवय लागली.
आता ही सवय कमी करत असताना पालकांना मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे आढळून येत आहे.
मुलांमध्येही आत्मसंयमाचा अभाव, जिज्ञासेचा अभाव दिसून येतो. भावनात्मकदृष्ट्या मुलं अस्थिर होत आहेत. हायपरॲक्टिव्ह डिसॉर्डर, डिप्रेशन आणि सोशल अँग्झायटी असलेली मुलं स्क्रीनकडे अधिक आकर्षित होतात.
मुलं लोकांपासून दूर होत आहेत. गोष्टी मनासारख्या घडल्या नाहीत की मुलं ऑनलाईन एंटरटेनमेंटकडे वळतात. संवाद कसा साधायचा हेच मुलांना कळत नाही. सोशल स्किल्स डेव्हलप होत नाही. आपण अनुभवातून शिकलो तो अनुभव या मुलांना मिळत नाही. यामुळे एकटेपणा वाढतो. त्याच्याही पलिकडे जाऊन आयुष्याला सामोरे जाण्याची क्षमता कमी होत आहे.
मुलांना वाचनाची सवय राहिली नाही.
वाचनामुळे आपली स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. याशिवाय आपण अनेक नवीन शब्द देखील शिकतो जे आपले शब्दसंग्रह आणि आपले संवाद कौशल्य सुधारतात. जेव्हा आपण काहीही वाचतो तेव्हा आपण त्यात रमून जातो, आपण आपला भूतकाळ विसरतो आणि वर्तमानात जगतो. पुस्तके वाचून आपण आपल्या वाईट आठवणी विसरतो, त्यामुळे आपला ताण कमी होण्यास मदत होते.

“अभिवाचन कट्टा:वाचू आनंदे” हा उपक्रम विद्यालयात सुरू करण्यात आला आहे.
आजकालची मुले वाचत नाहीत, असे सरसकट बोलले जाते, परंतु आपण मुलांच्या हातात, मुलांना हवी असलेली पुस्तके ठेवतो का, हा खरा प्रश्न आहे. तेव्हा वाचनसंस्कृती वाढवण्याची आणि टिकवण्याचीही जबाबदारीही खरंतर आपल्याच खांद्यावर आहे!
हाच उद्देश ठरवून पालक, आजी आजोबा,लेखक आणि शिक्षक या उपक्रमात सहभागी असणार आहेत. उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना आपण वाचलेल्या पुस्तकाविषयीचा परिचय व माहिती देणे त्याचबरोबर शारदा कृषी वाहिनीवर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वाचलेल्या पुस्तकावर मुलाखत घेणे. यामुळे संवाद कौशल्य ,मुलाखतीचे तंत्र, भाषाशैली याचे ज्ञान करून देणे हा वेगळा उद्देश देखील साध्य होईल. जाणीव प्रतिष्ठानचा साहित्य रत्न पुरस्कार, रोहिणी फाउंडेशन उत्कृष्ट लेख, रोहिणी फाउंडेशन काव्य लेखन प्रथम क्रमांक, पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघ पुरस्कार ही यंदा जाहीर झाला. हा माझ्यासाठी दुग्ध शर्करा योगच आहे. या आधीही 2021 चा राज्यस्तरीय कर्तुत्ववान पुरस्कार मला प्राप्त झाला आणि याचीच प्रेरणा आणि ऊर्जा म्हणजे यंदाचा हा पुरस्कार होय जेव्हा कौतुकाची थाप आपल्याला मिळते आणि आपल्या कार्याची दखल घेतली जाते तेव्हा एक वेगळे चैतन्य आणि ऊर्जा निर्माण होऊन नवनिर्मितीचा ध्यास लागल्याशिवाय राहत नाही आणि हीच नवनिर्मिती करण्याचं काम शिक्षक ध्येयाच्या पुरस्काराच्या माध्यमातून सर्व शिक्षकांमध्ये होत आहे. शिक्षक ध्येय साप्ताहिक फक्त विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकांनाही घडवत आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांची जडणघडण करणारे त्यांना लिहिते आणि वाचते करणारे तसेच विविध स्पर्धेतून प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कौतुकाची थाप तर मिळतेच पण आत्मविश्वास देखील वाढतोय आहे.