Home Breaking News ◽🌺◽◽🌺वाट तुझी पाहतो…! 🌺◻️🌺कु.मनिषा भिमराव बिऱ्हाडे ,पाचोरा, जळगांव

◽🌺◽◽🌺वाट तुझी पाहतो…! 🌺◻️🌺कु.मनिषा भिमराव बिऱ्हाडे ,पाचोरा, जळगांव

146

◽🌺◽◽🌺वाट तुझी पाहतो…!

🌺◻️🌺कु.मनिषा भिमराव बिऱ्हाडे ,पाचोरा, जळगांव

वाट तुझी पाहतो बेटा मी
वृध्दाश्रमात मला सोडले
म्हातारपणी वेळ ही आली
स्वप्न पाहिलेले तू तोडले
||1||

आई तुझी गेली सोडून ,
पोरका मजला तू केले ,
धन ,दौलत, गाडी, बंगले
वैभव सारे तूच नेले ||2||

शेतीचा आधार एक होता
ती ही तुला पुरली नाही
उतारवयात ह्या माझ्या ,
जीवाची होई लाही लाही||3||

वृद्धाश्रमात गप्पा – गोष्टी ,
भजन ,किर्तन आम्ही करतो
खोकून – ओकून होते पिडा
आमच्यातील एक रोज मरतो
||4||

सार्वजनिक अंत्यसंस्कार होती,
मुलगा देईना आम्हां खांदा
सुसंस्कृत म्हणवणारी पिढी
कसला त्यांचा गोरख धंदा?
||5||