Home Breaking News Chandrapur dist@ news • मागण्यांची पूर्तता न झाल्यास येत्या 25 जानेवारीला रस्ता...

Chandrapur dist@ news • मागण्यांची पूर्तता न झाल्यास येत्या 25 जानेवारीला रस्ता रोको आंदोलन-शासनाला दिला प्रा.रमेशचंद्र दहीवडे यांनी इशारा • अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्यांची अद्याप घेतली नाही शासनाने दखल! • शासनाविरोधी दिल्या आज महिला कर्मचाऱ्यांनी घोषणा !

159

Chandrapur dist@ news
• मागण्यांची पूर्तता न झाल्यास येत्या 25 जानेवारीला रस्ता रोको आंदोलन-शासनाला दिला प्रा.रमेशचंद्र दहीवडे यांनी इशारा
• अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्यांची अद्याप घेतली नाही शासनाने दखल!
• शासनाविरोधी दिल्या आज महिला कर्मचाऱ्यांनी घोषणा !

चंद्रपूर : किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

अंगणवाडी सेविकांना २६ हजार रुपये वेतन तर मदतनीस यांना २०हजार रुपये वेतन मिळावे या शिवाय ग्रॅज्युटी व पेंशन लागू करा या प्रमुख मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाचा ५०वा दिवस आहे . दरम्यान या आंदोलनाचे नेतृत्व करणारे सि.आय.टी.यू.चे दिग्गज नेते प्रा.रमेशचंद्र दहीवडे यांनी येत्या 25 जानेवारीला चंद्रपूर शहरात रस्ता रोको आंदोलन करण्याचा शासनाला इशारा दिला आहे.आज सोमवारी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी ठिय्या आंदोलन करीत शासनाविरोधी जोरदार घोषणाबाजी केली.या वेळी शोभा राहुलकर, शारदा लेनगुरे,संध्या खनके, सुरेखा तितरे, परविन शेख, रेखा महाजन, जिजाताई भांडेकर, कांता दखने, प्रेमिला बेंदले, प्रेमिला जगताप, माधुरी कवासे, माया कांबळे, अल्का नळे, वंदना जीवने, प्रियंका वनकर,विमल गावंडे , राधा सुकुंरवार, उज्वला पाटील सुषमा बेले , वंदना सुर्यवंशी यांच्यासह शेकडों अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.