Home Breaking News Chandrapur dist@ news • जोर जुलूस के टक्कर मे संघर्ष हमारा नारा...

Chandrapur dist@ news • जोर जुलूस के टक्कर मे संघर्ष हमारा नारा है! बाॅलेट पेपर पर चुनाव पुरे देश का नारा है ! • EVM हटाव- संविधान व लोकशाही बचावसाठी चंद्रपूरात जोरदार निदर्शने!

278

Chandrapur dist@ news
• जोर जुलूस के टक्कर मे संघर्ष हमारा नारा है! बाॅलेट पेपर पर चुनाव पुरे देश का नारा है !
• EVM हटाव- संविधान व लोकशाही बचावसाठी चंद्रपूरात जोरदार निदर्शने!

चंद्रपूर: किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर शहरात आज सोमवारी संध्याकाळी स्थानिक जटपूरा गेट परिसरात EVM हटाव व संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने EVM हटाव करिता शासनाविरोधी जोरदार घोषणाबाजी देत संध्याकाळी निदर्शने करण्यात आली.

आयोजित या आंदोलनात शेकडों कार्यकर्ते स्वयंस्फुर्तिंने सहभागी झाले होते.
देशाला भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, स्वास्थ्य सुविधा या शिवाय सरकारी उद्योग ,शाळांचे खाजगीकरण, शिक्षणा पासून ओबीसी, एससी, एसटी, मायनारिटी समाजाला दूर ठेवण्याचे षडयंत्र आदिं विषयांना घेऊन हे आंदोलन होते.बळीराज धोटे, नामदेव कन्नाके, ऍड .दत्ता हजारे, ऍड .जयंत साळवे, प्राचार्य सूर्यकांत खनके, यशोधरा पोतनवार किशोर पोतनवार, हरीश सहारे, आदिंनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन या पूर्वीच एका पार पडलेल्या बैठकीत केले होते. त्यांचे आवाहनाला चंद्रपूरकरांनी आज उत्तम प्रतिसाद दिला.
EVM हटाव ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती.आंदोलनात महिला व तरुणींनी देखील मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता हे विशेष!

आंदोलन बघण्यासाठी चंद्रपूरकरांनी जटपूरा गेट जवळ एकच गर्दी केली होती.