Home Breaking News Chandrapur taluka@ news • उर्जानगरात रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..!

Chandrapur taluka@ news • उर्जानगरात रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..!

175

Chandrapur taluka@ news
• उर्जानगरात रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..!

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:सहजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर

चंद्रपुर :- उर्जानगर कोंडी वार्ड क्र. 5, पोलिस स्टेशन दुर्गापुर येथील एकदंत युवा मंडळाच्या वतीने अयोध्या येथील श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून श्रीराम प्रतिमेची व हनुमानाची पूजा अर्चना, दीप प्रज्वलन, भजन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम करुन राम लल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नामदेवजी आसुटकर, संतोष पारखी, शुभम आंबेकर, मदनभाऊ चिवंडे, अक्षय पवार, प्रवीण गिलबिले यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकदंत युवा मंडळाचे अध्यक्ष नंदू मोंढे, उपाध्यक्ष निखिल भोयर, उपाध्यक्ष गणेश कोकडे, सचिव रोशन जीवतोडे, कोषाध्यक्ष रोहन बावणे, प्रमुख सदस्य आदित्य गिलबिले, वैभव दरेकर, सागर दडमल, रोहित तीतरे, तेजस खोब्रागडे, साहास कुळमेथे, आयुष गिलबिले, रोशन गिलबिले, जीवन बडगे, जागृत रामटेके, लोहित गिलबिले, गजानन सवळे, अभी कुळमेथे आणि आदर्श महिला बचत गटाच्या महिला यांनी अथक परिश्रम घेतले.