Chandrapur dist@ news
• काॅ.कांचन नन्नावरे यांचे क्रांतिकारी योगदान सदैव स्मरणात राहील – काॅ.रमेशचंद्र दहीवडे


चंद्रपूर:किरण घाटे
शास्त्रीय समाजवादी मंचच्या वतीने आज स्थानिक जनसंघर्ष भवन येथे काॅ . कांचन नन्नावरे यांच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त दुपारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काॅ कांचन नन्नावरे ह्या विद्यार्थी जीवनापासून आंबेडकर चळवळ ते डाव्या चळवळीत सदैव अग्रेसर राहून संघर्ष करीत होत्या.त्या आपल्या संघर्षिमय जिवनात दोन वेळा कारागृहात गेल्या. जेल मध्ये काॅ. कांचन नन्नावरे आजारी पडल्या .आजारीशी झुंज देताना त्या शहीद झाल्या अशा क्रांतीकारी योध्दीच्या योगदानाला आपण सदैव स्मरण केले पाहिजे. कांचनचे योगदान सदैव आमच्या स्मरणात राहील अश्या शब्दात काॅ . रमेशचंद्र दहीवडे यांनी आपले विचार व्यक्त केले.ते काॅ.कांचन स्मृती दिन कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी यशोधरा पोतनवार, प्रीतीशा साधना,किशोर पोतनवार, CPIचे प्रकाश रेड्डी, किशोर जामदार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आरंभी कॉ. अरुण भेलके यांनी कॉ. कांचनच्या बालपणापासून तर जेलमधील अखेर पर्यंतचा सर्व जीवनपट उपस्थितांसमोर आपल्या बोलण्यातून मांडला. यात कॉ. कांचन यांचे तुरुंगातील पत्र, कविता, लेख, नाटक, पुस्तकाचा काही भाग वाचून दाखविला. कांचन यांनी जेलजीवनात केलेलं लेखन पुस्तक रूपात प्रकाशित करुन वाचकांसमोर मांडण्याचा संकल्प या कार्यक्रमात व्यक्त केला. कॉ. कांचनच्या नावाने राजकीय प्रबोधनात्मक कार्यक्रम घेत राहण्याच्या उद्देशाने ” कॉ. कांचन नन्नावरे शास्त्रीय समजवादी मंच ” नावाचं बॅनर स्थापन करण्यात आले या मंचाअंतर्गत वर्षभर राजकीय वैचारिक व्याख्यानमाला सुरू करण्याचे ठरविण्यात आले. प्रीतीशा यांनी या प्रसंगी महिलांच्या प्रश्नावर आपले विचार व्यक्त केले . तर किशोर पोतनवार यांनी अवतरत असलेल्या फॅसिस्ट रामराज्यावर भाष्य केले .राजकुमार चिकटे यांनी कांचन यांच्या आठवणी सांगत अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. कॉ. कांचनला लाल सलाम! कॉ. कांचन अमर रहे!, मार्क्सवाद जिंदाबाद! कॉ. कांचनच्या आशयांना पूर्ण करू! भांडवलशाही मुर्दाबाद! समजवाद जिंदाबाद! इन्कलाब जिंदाबाद! जात, लिंग, वर्ग मुक्ती जिंदाबाद! च्या घोषणांनी या कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे निमंत्रक कॉ. राजेश पिंजरकर यांनी उपस्थितीतांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारीता निशा खोब्रागडे, अनुराधा धरनिवार, विद्या निब्रड, विमल गावंडे, प्रमोद गोडघाटे, मिता रंगारी यांनी अथक परिश्रम घेतले.


