Home Breaking News Chandrapur (jivti)@news • पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेच्या अनुषंगाने माजी उपसभापती...

Chandrapur (jivti)@news • पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेच्या अनुषंगाने माजी उपसभापती महेश देवकतेंची पाटणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट • नविन इमारत बांधण्यासाठी वन विभागाकडून होणार जागा उपलब्ध

116

Chandrapur (jivti)@news
• पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेच्या अनुषंगाने माजी उपसभापती महेश देवकतेंची पाटणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट
• नविन इमारत बांधण्यासाठी वन विभागाकडून होणार जागा उपलब्ध

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:संपादक

जिवती (चंद्रपुर) :अति दुर्गम जिवती तालुक्यातील पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ती इमारत मोडकळीस आलेली आहे.सदरहु इमारत योग्य नसून ती इमारत मोडकळीस आलेली आहे .पावसाळ्यात त्या इमारतीची अवस्था फारच गंभीर असते.त्यामुळे डॉक्टरांना सुद्धा रूग्णांची तपासणी करतांना बरीच तारेवरची सर्कस करावी लागते. अशा परिस्थितीत त्यांना रूग्णांची सेवा करणे फार अवघड होते.या सर्व बाबींचा विचार करता पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ही निर्लेखन करण्यात आली होती. ती निर्लेखन झाल्यामुळे इथे नवीन इमारत होणे अत्यंत महत्त्वाचे व गरजेचे होते. सदरहु बाबींची दखल घेत जिवती पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश बळीराम देवकते यांनी सातत्याने ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला. शेवटी केद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांच्या कडून ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी मंजुर करून घेतला. त्या अनुषंगाने ना. सुधीर मुनगंटीवार यांनी महेश देवकते यांना सूचना केली. आपण इमारत मंजूर केली; पण इमारत चांगल्या जागी आणि सुसज्ज झाली पाहिजे. त्यासाठी जागा कमी पडत असेल; तर जागा कशी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावे.त्याच दृष्टीकोनातून महेश देवकते यांनी जागेची पाहणी केली असता पाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे असलेली वन विभागाची जागा बघितली व त्या जागेची PHC साठी मागणी करायची असा त्यांनी निर्णय घेतला.
◾◽जागा पाहणी करते वेळी
जिवती पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश देवकते, महिला डॉ .शेडमाके बांधकाम विभागचे अभियंता राठोड पाटण येथील सरपंच सीताराम मडावी, माजी उपसरपंच भीमराव पवार, पंचायत समितीच्या माजी सभापती अंजनाताई भिमराव पवार, सामाजिक कार्येकर्ते विठल ता. चव्हाण, युवा कार्यकर्ते विश्वनाथ देवकते आदींची प्रामुख्याने उपस्थित होती.