Chimur taluka@ news
•चिमूर राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र व राज्य सरकारचा निषेध करीत केले निवेदन सादर
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
भिसी (चिमूर )आज गुरुवारला भिसी येथे प्रदेश काँग्रेस व जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या सूचनेच्या अनुषंगाने रा. कॉ. चे जिल्हा उपाध्यक्ष श्रीनिवास शेरकी,तालुका अध्यक्ष राजू मुरकुटे, रा. कॉ. भिसी शहर अध्यक्ष किशोर गभणे यांच्या नेतृत्वात केंद्र व राज्यसरकारच्या दडपशाही धोरणाच्या तसेच राष्ट्रवादीचे तरुण तडफदार आमदार रोहित पवार या शिवाय प्रदेश अध्यक्ष आ.जयंत पाटील , शिवसेनेचे खा.संजय राऊत,आणि देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना ED,CBI,Incom Tax चा गैरवापर करून अकारण टार्गेट केल्या जात आहे,राज्य सरकारच्या चुकीच्या जनहीतविरोधी निर्णयांच्या विरोधात आ.रोहित पवार यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आवाज बुलंद केला,त्या सर्व मागण्या आणि केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणाच्या निषेधार्थ एक लेखी निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत केंद्र व राज्य सरकारला देण्यात आले.त्याआधी केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्रातील खोके सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली,युवा विद्यार्थ्यांच्या समस्या,शेतकरी,बेरोजगारी, महिला सुरक्षा,कामगार,अंगणवाडी सेविका,शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे हप्ते मिळत नाही नोकर भरती साठी हजारो रु. शुल्क आकारून पेपर फुटी होते.या मुद्द्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडन्यासाठी हे निवेदन देण्यात आले.
या वेळी रा.कॉ.जिल्हा उपाध्यक्ष श्रीनिवास शेरकी रा.कॉ.भिसी शहराध्यक्ष किशोर गभने ,अमृत बनसोड,राजू भीमटे,अहमद शेख,नरड ,नरेश कडवे,गरमडे ,विजय मातणे,राजू कुमले,अनिल शेंडे,अरविंद भुजाडे,दिनेश दिघोरे,खटुजी दिघोरे,पिंटू नागोसे (पत्रकार ),दुर्वास भुजाडे,हरिदास जांभुळे,रामचंद्र दिघोरे ,रवींद्र गोंगले (पत्रकार ),प्रकाश मेश्राम,शांताराम नान्हे,प्रभाकर बोरकर,मनोहर वानखेडे,खटुजी रंदई,दिगंबर खोब्रागडे,मारोती दोडके,काकाजी नागपुरे,संतोष मुरकुटे,विलास आष्टनकर,दुर्वास कांबळी,सुमित कांबळे,मनोज दिघोरे,राहुल दिघोरे आदिं उपस्थित होते.