Home Breaking News ◾◽तेजोमय व्हावे जीवन! 🔲वैशाली राऊत सहज सुचलं सदस्य नागपूर

◾◽तेजोमय व्हावे जीवन! 🔲वैशाली राऊत सहज सुचलं सदस्य नागपूर

404

◾◽तेजोमय व्हावे जीवन!

🔲वैशाली राऊत सहज सुचलं सदस्य नागपूर

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

🔸◽रामराज्य यावे पुन्हा
तेजोमय व्हावे जीवन
नको राग असूया मनी
लाभावे प्रेमाचे संजीवन.(१)

असावे सर्व समाधानी
नको विकल्पाला थारा
जीवनात बरसाव्या
नेहमी आनंदाच्या धारा.(२)

आयुष्याच्या पटलावर
स्वप्न उद्याचे रंगवावे
सत्कर्म करून नेहमी
आपले जीवन फुलवावे.(३)

ठेवावा शबरी सम विश्वास
मीरा सम भक्ती करावी
सुदामा सम मैत्री निभवूनी
जीवनाला नवी दिशा द्यावी.(४)

अहंकाराचे शस्त्र गाळूनी
मनी प्रेमाचे कोंब फुटावे
लीनतेला अंगिकारून
शालीनतेला रूजवावे.(५)

असे परिवर्तन करेल
चांगल्या गोष्टींचा आरंभ
सूरवात क्रांतीची घडवेल
तेजोमय जीवनाचा प्रारंभ.(६)