Home Breaking News chandrapur city @news • शिल्पा सुहास कांबळेंची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर...

chandrapur city @news • शिल्पा सुहास कांबळेंची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर अध्यक्षपदी नियुक्ती ; अनेकांनी केले त्यांचे निवडीचे स्वागत!

126

chandrapur city @news
• शिल्पा सुहास कांबळेंची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर अध्यक्षपदी नियुक्ती ; अनेकांनी केले त्यांचे निवडीचे स्वागत!

चंद्रपूर :किरण घाटे

सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या चंद्रपूर शहरातील सामाजिक महिला कार्यकर्त्या शिल्पा सुहास कांबळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चंद्रपूर शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांना नुकतेच माजी गृहमंत्री अनिलबाबू देशमुख यांचे हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.या वेळी चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष दिपक जयस्वाल , महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके व चंद्रपूर शहर कार्यकारी जिल्हाध्यक्ष सुधाकर कातकर प्रामुख्याने उपस्थित होते.दरम्यान शिल्पा कांबळे यांच्या नियुक्तीचे अनेकांनी स्वागत केले आहे.कांबळे यांनी काही रास्त मागण्यांसाठी तदवतचं शहरातील ज्वलंत प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी आज पावेतो चंद्रपूरात
अनेक आंदोलने उभी केली होती.त्यांच्या ब-याच आंदोलनाला यश प्राप्त झाले होते.त्यामुळे शहरातील अनेक प्रश्न व समस्या मार्गी लागल्या होत्या हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.