chandrapur city @news
• रस्ता रोको आंदोलनामुळे
अर्धा तास मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प –
आपने केले आज चंद्रपूरात आंदोलन !
• आंदोलन स्थळाला पोलिस छावणीचे स्वरूप
• आपच्या अनेक पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना अटक व सुटका
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत: सहसंपादक
चंद्रपूर:शहरातून जाणाऱ्या चंद्रपूर बल्लारशाह या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण
दिवसेंदिवस वाढत चालल्याने त्याठिकाणी अपघातांची मालिका थांबल्या न थांबत नाही.ह्याच महामार्गांवर अष्टभुजा बाबूपेठच्या मध्यभागी रेल्वे ओवर ब्रिजचे काम टोल कंपनीला पूर्ण करायचे असून बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने आपली नैतिक जिम्मेदारी सोडून ते जनतेकडून सर्रासपणे टोलटॅक्स वसुली करतात . अश्या वसुली करणाऱ्या विसापूरच्या WCBTRL कंपनीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा व भविष्यात होणाऱ्या अपघाताची जबाबदारी टोल कंपनीने स्वीकारावी तद्वतच तात्काळ सदरहु पुलाचे काम सुरू करावे .या प्रमुख मागणीसाठी आज मंगळवारला अष्टभूजा जवळील रेल्वे ओवर ब्रिज वर अर्धा तासांपर्यंत रास्ता रोको आंदोलन आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. दरम्यान या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.कुडे यांनी यावेळी सांगितले कि येत्या 15 दिवसांत प्रशासनाने या बाबतीत पाऊल उचलले नाही तर आम आदमी पार्टी तर्फे या पेक्षा ही तीव्र आंदोलन करण्यात येईल .रस्ता रोको करणा-या अनेक पदाधिका-यांना व कार्यकर्त्यांना पोलिसांकडून या वेळी अटक करण्यात आली . काही वेळा नंतर त्यांना सोडून देण्यात आले.
आंदोलनस्थळी आपचे जेष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, शहर अध्यक्ष योगेश गोखरे, किसान आघाडीचे दीपक बेरशेटीवार, जिल्हा सोशल मीडिया हेडचे राजेश चेडगुलवार, जिल्हा संघटन मंत्री भिवराज सोनी, जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गंडलेवार, शहर युवा अध्यक्ष संतोष बोपचे, जिल्हा महिला अध्यक्ष ज्योती बाबरे महिला शहर अध्यक्षा ऍड. तब्बसूम शेख,बल्लारपूर शहर अध्यक्ष रवी पुप्पलवार, वाहतूक जिल्हाध्यक्ष महेंद्र धुमने, वाहतूक जिल्हा उपाध्यक्ष संगम सागोरे, जिल्हा युवा उपाध्यक्ष मनीष राऊत, जिल्हा युवा संघटन मंत्री अनुप तेलतुबडे, शहर उपाध्यक्ष सुनील सतभय्या, क्रिश कपूर, मंगला रेंभनकर, सुशांत धकाते, अक्षय गोवर्धन, सुजित चेटडगुलवार, राजू मोहुर्ले, हरिदास पिंगे, अनुज चव्हाण, गुड्डू मेश्राम, विशाल झामरे, राजू यादव, आदिं हजर होते .या शिवाय बाबुपेठ येथील जनता मोठ्या संख्येने या आंदोलनात उतरली होती.


