Home Breaking News Ghugus city@ news • MPCB कार्यालयाचा विरोधात सफेद झंडा कामगार संघटनेचे धरने...

Ghugus city@ news • MPCB कार्यालयाचा विरोधात सफेद झंडा कामगार संघटनेचे धरने आंदोलन

98

Ghugus city@ news
• MPCB कार्यालयाचा विरोधात
सफेद झंडा कामगार संघटनेचे धरने आंदोलन

✍️संजय तिवारी
सुवर्ण भारत:प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस – येथील लायडस मेटल एनर्जी प्रा. लि. कंपनी हे घुग्घुस शहरातील तिसर्‍या क्रमांकावर येते. परंतु या कंपनीचा प्रदुषणाद्वारे लोह्याचे कण हे कंपनी बाहेर सोडते. या लोह्याचा कणामुळे मानवी जिवाला धोका निर्माण होऊ शकतो आधिच प्रदुषणामुळे नागरिकांमध्ये दमा, टिबी, खोकला, कॅन्सर, अशा अनेक आजाराला घुग्घुस शहरातील नागरिकांना सामोर जावे लागत आहे. हेच नाही तर घुग्घुस शहरातील नागरिकांमध्ये चक्कर येण्याचे प्रमाण सुध्दा वाढले आहे. म्हणून वारंवार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर कार्यालया सफेद झंडा कामगार संघटना अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांचा माध्यमातून अनेक निवेदनाद्वारे अधिकार्‍यांना लक्षात आनुन सुध्दा MPCB अधिकार्‍यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी नाईलाजाने आज दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली आहे. असे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी सांगितले आहे
या आंदोलनामध्ये मागण्या लायडस मेटल कंपनी वरती कारवाई का केली गेली नाही यांचे लेखी स्वरूपात द्यावे.
लायडस मेटल कंपनी हे प्रदुषणाद्वारे लोह्याचे कण बाहेर सोडते या कंपनीला घुग्घुस शहराचा दहा किलोमीटर दुर अंतरावर करण्यात यावे. बेरोजगार युवकांना स्थायी रोजगार देण्यात यावे.मागणी केली