chimur city@ news
• मोहन पिसेंसह अन्य एका व्यापारी बंधूचा भाजपात प्रवेश
चंद्रपूर :किरण घाटे
चिमूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत नेरी येथील मूळ निवासी सध्या चिमूर शहरात एक प्रतिष्ठित सराफा व्यापारी म्हणून ओळखले जाणारे मोहन पिसे यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.याच वेळी चिमूरचे अन्य एक प्रतिष्ठित व्यापारी गिरीश भोपे यांनी देखील भाजपात प्रवेश केल्याचे वृत्त आहे.
या पक्षप्रवेशाप्रसंगी प्रामुख्याने भाजपा तालुकाध्यक्ष राजू झाडे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत वारजूकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिडे, भाजपा ज्येष्ठ नेते भिमराव ठावरी, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे, भाजपा ज्येष्ठ नेते रमेश कंचर्लावार, भाजपा युवा नेते समीर राचलवार, सं.गां.नि.अ.यो. समितीचे अध्यक्ष संजय नवघडे, भाजपा नेते योगेश नाकाडे, विलास कोराम, भाजयुमो शहर महामंत्री श्रेयश लाखे या शिवाय भाजपा पदाधिकारी तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.


