Bhadrawati taluka@news
• “शिवनेरी” भद्रावती कार्यालय येथे विद्यार्थी मदत कक्षाची निर्मीती
•युवा-युवती सेना तर्फे वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थी विद्यार्थींनीच्या विविध समस्यांचे निराकरण
✍️,मनोज मोडक
सुवर्ण भारत :ता.प्र.भद्रावती
भद्रावती :वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या समस्या, अडचणी, तक्रारी सोडविण्याकरीता शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाव्दारे वरोरा येथील विधानसभा मध्यवर्ती कार्यालय “शिवालय” तसेच वरोरा व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) कार्यालय “शिवनेरी” भद्रावती येथे युवा-युवती सेनेतर्फे विद्यार्थी मदत कक्ष सुरु करण्यात आले.
७५, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाद्वारे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, युवा सेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या संकल्पनेतून तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या, युवासेना कार्यकारणी सदस्य, सिनेट सदस्य मुंबई विद्यापीठ शितलताई देवरुखकर शेठ, युवा सेना कार्यकारणी सदस्य हर्षल काकडे, पुर्व विदर्भ युवासेना सचिव प्रा. निलेश बेलखेडे यांचे मार्गदर्शनात, ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या शैक्षणिक अडचणी लक्षात घेता व त्यांच्या समस्या संपूर्ण ऐकून त्यांना शैक्षणिक जीवनामध्ये कोणती भविष्यात अडचण नको याकरिता समस्या तात्काळ निकाली काढण्याच्या दृष्टीकोनातून वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या शैक्षणिक अडचणी दूर करण्याकरीता सदर उपक्रम राबवीण्यास सुरुवात करण्यात आली.
युवासेना जिल्हाप्रमुख रोहण कुटेमाटे, युवती सेना प्रमुख कु. प्रतिभा मांडवकर, युवती सेना जिल्हा समन्वयक तथा उपसभापती भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती सौ. अकलेषा भोयर (जिवतोडे) यांचे नेतृत्वात, वरोरा-भद्रावती विधानसभाप्रमुख रविंद्र शिंदे, उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने, वरोरा तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल यांचे सहकार्याने वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील वरोरा येथील विधानसभा मध्यवर्ती कार्यालय “शिवालय” व भद्रावती येशील “शिवनेरी” कार्यालय येथे वरोरा-भद्रावती युवासेना विधानसभाप्रमुख अभिजीत कूडे, युवतीसेना विधानसभा प्रमुख कनिष्का आस्वले, युवासेना जिल्हा सरचिटणीस येसू आर्गी विधानसभा युवासेना उपजिल्हा प्रमुख शरद पुरी, उपजिल्हा युवतीसेना प्रमुख शिव गुडमल यांच्या पुढाकाराणे “विद्यार्थी मदत कक्ष” ची निर्मिती करण्यात आली आहे.
यामध्ये युवा-युवती सेनेचे वरोरा तालुका युवासेना प्रमुख विक्की तावाडे, वरोरा तालुका युवती सेनाप्रमुख प्रणाली मडकाम, भद्रावती तालुका युवासेना प्रमुख राहुल मालेकर, तालुका युवती सेना प्रमुख स्नेहा बन्सोड, वरोरा शहर युवासेना प्रमुख प्रज्वल जानवे, युवती सेना प्रमुख तेजस्विनी चंदनखेडे, भद्रावती शहर युवासेना प्रमुख मनोज पापडे, गौरव नागपुरे, समीर बल्की, अनिरुद्ध वरखडे, तेजस कुंभारे, गोपाल पारदे, साहिल काकडे, गोपाल सातपुते, नेहा पवन किन्नाके, साक्षी दौलतकर, साक्षी वैद्य, शुभांगी कोडेकर, साक्षी रोकडे, सीमा सोयाम, ममता मेश्राम, ज्योती पोयाम, सोनल सालेकर, पूनम सरपाते, सुजण मांढरे, सुरज सूर्यवशी, हेमंत शेरकी, शुभम कोहपरे, फैजल शेख व रामानंद वसाके युवा-युवती सेना पदाधिकारी यांना जवाबदारी देण्यात आली आहे.
आता पर्यंत युवा-युवती सेनेमार्फत शेगाव येथील विद्यार्थ्यांचे रस्त्यासाठी आंदोलन करण्यात आले, मुधोली बससेवा सुरू करण्यात आली, खांबाळा येथील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यात आल्या, नागरी मार्ग बंद झालेली बससेवा सुरू करण्यात आली. माढेळी येथे विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला, नागरी येथे विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन कार्यक्रम, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असे अनेक उपक्रम घेवून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यात आल्या.
नुकतेच युवासेना विधानसभा अधिकारी अभिजीत कुडे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थीनीसाठी येरखेडा येथून साखरा, उमरी, गुंजाळा, बोरगाव, वडधा बससेवा सुरू करावी करीता निवेदन देण्यात आले. याप्रसंगी निशा पेचे, साक्षी मोडक, सिद्धी मोडक, साहीली बलकी, निवृत्ती नन्नावरे, लक्ष्मी दोडके, सिद्धी चौधरी, दिपाली मुंडरे, नेहा झींगरे, विनंती बोढाले, समीक्षा बोढेकर, तुलसी गेडाम, अमृता पोईणकर, मंजुषा पोईणकर, कल्याणी कुळमेथे, मानशी कुळमेथे विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
या मदत कक्षाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना आवाहन करण्यात येते की, आपल्या कोणत्याही शैक्षणिक समस्या व अन्य कोणतेही समस्या करिता वरोरा-भद्रावती विधानसभेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवालय व शिवनेरी कार्यालय साधून व वरोरा-भद्रावती विधानसभा युवासेना अधिकारी अभिजीत कुडे यांच्याकडे आपल्या समस्या नोंदवाव्या, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा युवासेना प्रमुख रोहन कुटेमाटे यांच्यातर्फे करण्यात येत आहे.


