Home Breaking News Gadchiroli dist@ news • गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने भाजप शासनाच्या विरोधात “चिखल...

Gadchiroli dist@ news • गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने भाजप शासनाच्या विरोधात “चिखल फेक” आंदोलन

86

Gadchiroli dist@ news
• गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने भाजप शासनाच्या विरोधात “चिखल फेक” आंदोलन

•महागाई, बेरोजगारी, NEET परीक्षा घोटाळा, खते-बियाण्यांचा काळाबाजार, कायदा सुव्यवस्था आदिं प्रश्नांच्या बाबतीत होतेय “हे “आंदोलन !

गडचिरोली : किरण घाटे
राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरूण, गरिब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे.
महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, महिला सुरक्षा, खते, बि-बियाणांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक, चिखलात सुरु असलेली पोलीस भरती, राज्यातील सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालवलेली चालढकल, राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. श्रीमंतांची पोर गोरगरिबांना गाड्याखाली चिरडून मारत आहेत. मुलींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहेत. सत्ताधारी सरकारच्या विरोधात जनतेत तीव्र संताप असून सरकारला जाब विचारण्यासाठी भाजप सरकार विरोधात, इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे भाजप सरकारच्या प्रतिकृती पुतळ्यावर चिखल फेक करून आंदोलन करण्यात आले. सदरहु आंदोलनात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोलीचे महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी,सचिव,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे विश्वजीत कवासे, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोलीचे सतीश विधाते, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोलीचे वसंत राऊत,अ. जा. जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोलीचे रजनीकांत मोटघरे,तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चामोर्शीचे प्रमोद भगत,उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोलीचे शंकरराव सालोटकर,शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोलीचे दत्तात्रय खरवडे, जिल्हासचिव काँग्रेस कमिटी गडचिरोलीचे सुनील चडगुलवार,महासचिव काँग्रेस कमिटी गडचिरोलीचे देवाजी सोनटक्के, सोशलमीडिया जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोलीचे संजय चन्ने, रवी मेश्राम,दिवाकर निसार, पुष्पलता कुमरे, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, ममता मेश्राम, नेताजी गावतुरे, हरबाजी मोरे, कुसुम आलाम, छाया कोव्हे, पांडुरंग घोटेकर, प्रफुल आंबोरकर,काशिनाथ भडके, श्रीनिवास तडपल्लीवार, सुरज भांडेकर, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल येलटीवार, घनश्याम मुरवतकर, चारुदत्त पोहाणे, माजीत भाऊ, ओमप्रकाश डोंगरे, राजेंद्र कुकडकर, बाबुराव गडसूलवार, उमेश उईके, सुरज मडावी,प्रशांत कापकर, अनुप सिकंदर,भरत येरमे, नंदू वाईलकर,हंसराज उराडे, दिगंबर धानोरकर, कल्पक मोप्पीडवार, चंद्रकांत मडावी, सुदर्शन उंदीरवाडे, भैय्याजी मुद्दमवार, नीलकंठ भांडेकर, लतीफ तोरे, टय्या खान, जावेद खान, अविनाश श्रीरामवार सह जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.