Gadchiroli dist@ news
• महाराणी वीरांगना दुर्गावती यांची पुण्यतिथी साजरी!
सुवर्ण भारत: जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली – नॅशनल आदिवासी महिला फेडरेशन नारी शक्ती संघटना गडचिरोली व सार्वजनिक बहुउद्देशीय संस्था नवेगांव यांचे संयुक्त विद्यमाने विरांगणा महाराणी दुर्गावती यांच्या 460 व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम सृष्टी सेलिब्रेशन हॉल सेमाना रोड नवेगांव येथे काल पार पडला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारी शक्ती संघटनेच्या अध्यक्षा जयश्री येरमे ह्या होत्या.कार्यक्रमाला रेखा तोडासे कार्याध्यक्ष, प्रतीक्षा कोडापे रोहिणी मसराम, माधुरी पडोटे, नेहा गेडाम,ज्योती जुमनाके तसेच पोलीस भरतीसाठी आलेले युवक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वीरांगणा राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन,माल्यार्पण व पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले. सदरहु कार्यक्रमात मान्यवरांनी विरांगणा राणी दुर्गावती यांच्या कार्यकाळात त्यांनी जनतेच्या हितासाठी केलेल्या गौरवास्पद कामगिरीमुळे समाजाला कशी प्रेरणा मिळाली, समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी झटणारे महामानव थोर पुरुष व क्रांतिकारी आणि विचारवंत यांचे विचार समाजाला कशी प्रेरणा देऊन चळवळ पुढे नेण्यास मदत होते व त्यामुळे कुटुंबाच्या संसार कसा सुखी व समाधानी होतो, याबाबत मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
नारी सक्ती संघटने द्वारे मागील पाच वर्षाच्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत योग्य प्रवाह द्वारे केलेल्या सामाजिक चळवळी संबंधी माहिती या कार्यक्रमात मान्यवराने विशद केली. नारी सक्ती संघटना ही जरी आदिवासीच्या नावाने स्थापन केली असली तरी सर्व घटकातील महिला वरील अत्याचाराबाबत सदैव निराकरण करण्यासाठी पाठपुरावा करणारी संघटना आहे.त्यामुळे तळागाळातील विशेष करून आदिवासी भागातील महिलांनी या संघटनेशी जास्तीत जास्त संख्येनी जोडणे आवश्यक आहे. जेणेकरून महिला सक्षमीकरणास वाव मिळेल आणि संघटना सक्षमपणे पुढे जाण्यास मदत होईल. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पोलीस भरतीसाठी आलेल्या युवकांशी चर्चा करून व त्यांच्या अडचणी नारी सक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या व त्यांना काही पोलीस भरती मध्ये काही अडचणी आहेत किंवा कसे, अडचणी असल्यास नारीशक्ती संघटना सदैव पोलीस भरती साठी आलेल्या युवकांच्या मदती साठी तत्पर असल्याचे यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले व पोलीस भरतीसाठी आलेल्या सर्व युवकांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन ज्योती जुमनाके यांनी केले,प्रास्ताविक भाषण माधुरी पडोटी यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार रोहिणी मसराम यांनी मानले.


