Home Breaking News Bhadravti taluka@ news •चंदनखेडा जि. प.शाळेला प्रथम पुरस्कार बहाल

Bhadravti taluka@ news •चंदनखेडा जि. प.शाळेला प्रथम पुरस्कार बहाल

188

Bhadravti taluka@ news
•चंदनखेडा जि. प.शाळेला प्रथम पुरस्कार बहाल

सुवर्ण भारत: किरण घाटे (उपसंपादक)

भद्रावती: महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग द्वारा आयोजित “मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ,सुंदर शाळा” सन २०२३-२४ घेण्यात आली होती.या स्पर्धेत PM SHRI जि.प.उ.प्रा.शाळा,चंदनखेडा ही शाळा तालुक्यातून “प्रथम पुरस्काराची” मानकरी ठरली होती.

सदरहु स्पर्धेत प्रथम,द्वितिय,व तृतीय अश्या शाळा निवडण्यात आल्या होत्या.भद्रावती तालुक्यात जवळपास सर्वच शाळा स्पर्धेत उतरल्या होत्या पण या स्पर्धेचे मुल्यमापन निकषामध्ये व त्याची पुर्तता करणा-या शाळांच्या गुणांक्रमात जि.प.उ.प्रा.शाळा,चंदनखेडा तालुक्यात अव्वल ठरली होती.मुल्यमापन निकषात शाळा व शाळा परिसर,विद्यार्थी गुणवत्ता,भौतिक सुविधा,सहशालेय उपक्रम,आरोग्यविषयक जागृती,सामाजिक सहभाग, वृक्षारोपण मुलींचे आत्मसंरक्षण,बचत बँक,राष्ट्रीय उपक्रमातील सहभाग,मासीक पाळी व्यवस्थापन,लिंग समभाव उपक्रम,वैज्ञानिक जाणीव जागृती,क्रिडा,सांस्कृतिक तथा व्यक्तिमत्व विकास आदि उपक्रमात शाळेचा विद्यार्थी केंद्रीत व स्वयंशासीत असलेला सहभाग याआधारे ही शाळा अव्वल राहिली.

महाराष्ट्र शासनाने घोषीत केल्याप्रमाणे पुरस्काराचे बक्षीस आर्थिक स्वरुपात ३ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण पं.स.भद्रावती येथे एका छोटया्खानी कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांचे हस्ते , गटशिक्षणाधिकारी, डॉ प्रकाश महाकाळकर तसेच वि .अ.शिद्दमशेट्टीवार यांचे उपस्थितीत,शाळेच्या जेष्ठ शिक्षिका प्रतिभा गुंडमवार यांना ३ लक्ष रुपयांचा धनादेश सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला.

सदर स्पर्धेत उतरण्यासाठी तथा यश प्राप्तीसाठी सरपंच नयन जांभुळे , समस्त ग्रा.पं.कमेटी , अनिल कोकुडे ,यशवंत महाले अनिता आईंचवार ,शाळेचे जेष्ठ शिक्षक राजेश गायकवाड,पंडीत लोंढे,सुभाष कुंभारे,अर्चना कुंभारे,अरविंद मेश्राम,भावना गुंडमवार,यशवंत मगरे या सर्व शिक्षक वृदांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले, या यशाचे शिलेदार म्हणुन सर्वांचा सहभाग तथा मार्गदर्शन मोलाचे ठरले.शाळेला प्राप्त झालेल्या बहुमानाबद्दल शाळेचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केल्या जात आहे.