Varora city @news
•आनंदवन मध्ये महिलेची हत्या प्रकरनी आरोपी पोलीसांच्या कोठडीत
सुवर्ण भारत:खेमचद नेरकर
तालुका प्रतिनीधी, वरोरा
Varora:दिनांक 26/06/2024 रोजी आनंदवन वरोरा येथे आरती दिगंबर चंद्रवंशी वय 24 वर्ष राहणार वरोरा हिचा खूण झाल्याबाबत पोलीस स्टेशन वरोरा येथे तक्रार प्राप्त झाल्याने अप.क्रमांक 518/2024 कलम 302 भादवी नुसार अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आज रोजी वरोरा पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून 24 तासाच्या आत अज्ञात आरोपीचा शोध घेऊन आरोपी नामे समाधान माळी रा.चोपडा, जळगाव ह. मु. वरोरा याला ताब्यात घेऊन, विचारपूस केली असता, त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले.
सदर कारवाई मुंमक्का सुदर्शन, मा.पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्रीमती रीना जनबंधू, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रपूर, श्रीमती नायोमी साटम, सहायक पोलिस अधीक्षक, उपविभाग वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन वरोरा येथील पोलीस निरिक्षक अमोल काचोरे, स. पो.नी विनोद जांभळे, पो. उप नि धीरज मसराम, पोहेका दिलीप सुर, दीपक दुधे, किशोर बोधे, पोलीस अंमलदार मोहन निषाद, शशांक बदामवार, महेश गवतूरे, रोशन तमशेट्वार यांनी केली.


