Ballarpur taluka@ news
• बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पळसगांव येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक संपन्न; शेंकडों कार्यकर्ते बैठकिला उपस्थित!
बल्लारपूर -किरण घाटे
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पळसगाव वानढरेवाडी येथे कार्यकर्त्यांची एक बैठक संपन्न झाली. सदरहु बैठकीला पळसगाव मानोरा इ .टोली ,कोठारी ,आंबडी कोर्टी मक्ता, गीली गीली ,कळमगांव आदि गावातील शेकडों कार्यकर्ते उपस्थित होते .या बैठकीला प्रामुख्याने घनश्याम मुलचंदानी विनोद अहिरकर ,गोविंदा उपरे यांनी मार्गदर्शन केले.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना सहकार्य करत प्रचंड मते मिळाली . त्यांच्या विजयात बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे.धानोरकर यांनी विजय संपादन केल्यामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पळसगांव व कोठारी या भागातील कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले. त्यांची मेहनत त्यांची ताकद या निवडणुकीत जोमाने कामाला लागून विजय संपादन करण्यास सहकार्य केल्याने बल्लारपूर विधानसभेत काँग्रेसची ताकद वाढल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे .याचप्रमाणे भविष्यात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवारांस भरघोस मताने विजय करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी बोलून दाखवला. कार्यकर्त्यांत मोठा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. सदरहु बैठकीला हर्ष वाचाळे ,नितीन माकुलकर ,सुरेश वाचाळे बंडू इटलकर ,प्रमोद, दीपक लोहे ,नामदेव बावणे ,हिवरे ,विनोद वाघमारे ,राजेश डुमणे ,बंडू वासाळे वासुदेव येरगुडे , ,देविदास नरेश बुरांडे, सुनील कोळे ,विलास गवारे , दिलीप भोयर अजय उपरे ,घनश्याम बुरांडे ,संघर्ष वैकुंठवार आदि कार्यकर्ते उपस्थित होते.


