Home Breaking News Chandrapur city @news •”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा महिलांना लाभ मिळण्यासाठी तात्काळ...

Chandrapur city @news •”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा महिलांना लाभ मिळण्यासाठी तात्काळ प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची मागणी •आणि शासनाने लाडकी बहीण योजनेत केले मोठे बदल!

245

Chandrapur city @news
•”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा महिलांना लाभ मिळण्यासाठी तात्काळ प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची मागणी

•आणि शासनाने लाडकी बहीण योजनेत केले मोठे बदल!

सुवर्ण भारत शंकर महाकाली (संपादक)

चंद्रपूर:- महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व आरोग्य आणि पोषणात सुधारणा करुन कुटुंबामध्ये महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” ही योजना दि. 01 जुलै 2024 पासून सुरु केलेली असून दि.15 जुलै 2024 पर्यंत सदर योजनेचा अर्ज भरून राज्यातील २१ ते ६० वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांच्या बैंक खात्यात दरमहा रु.१,५००/- इतकी रक्कम दिली जाईल याचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड, उत्पन्न व अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे तात्काळ प्रमाणपत्र उपलब्ध कसे करुन देता येईल, याची सुविधा करण्यासंदर्भात शिवसेना भारतीय कामगार संघटना चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी जिल्हाधिकारी विनय गौड़ा व चंद्रपुरचे तहसीलदार विजय पवार यांना निवेदनाद्वारे मागणी केली.

परंतु शासनाने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा महिलांना व मूलींना लाभ मिळण्यासाठी अर्ज भरण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ करुन अडीच लाखांचा उत्पन्न दाखला नसेल तर पिवळं व केशरी रेशनकार्ड अनिवार्य करीत वयाची मर्यादा ६५ वर्षांपर्यंत वाढवली. परराज्यातील महिलेचा महाराष्ट्रात विवाह झाल्यास पतीचा जन्माचा किंवा शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य करुन पात्र कुटुंबातील अविवाहित महिलांना योजनेचा लाभ मिळणार असून पाच एकर शेतीची अट देखील वगळण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातील जास्तीत जास्त महिलांना व मूलींना याचा फायदा होणार आहे.

महिलांचे आरोग्य व पोषण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत असून महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याने त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होत असल्यामुळे राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देवून त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करुन महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर होवून राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळेल. तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करण्याचे शासनाचे उद्देश्य आहे.

यावेळी चंद्रपुरचे तहसीलदार विजय पवार यांनी इतर शासकीय किंवा शालेय कामाकरिता लागणारे प्रमाणपत्र देखील तात्काळ उपलब्ध करुन देण्याची ग्वाही शिवसेना भारतीय कामगार संघटना चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांना दिली असता यावेळी वाहतुक संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान, कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष दिपक कामतवार, शिवसेना उर्जानगर विभाग प्रमुख विक्की महाजन यांची उपस्थिती होती.