Home Breaking News Chandrapur City@News •चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – वंचित बहुजन युवा...

Chandrapur City@News •चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

100

Chandrapur City@News
•चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

चंद्रपूर: किरण घाटे

सतत आलेल्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
नदी नाल्या समिपची उभे पिके पूर्णतः वाहून गेल्याचे चित्र आजही दृष्टीक्षेपात पडत आहे.तदवतचं पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक घरांची पडझड झाली आहे.
दरम्यान चंद्रपूर जिल्हा “ओला दुष्काळ “जाहीर करुन शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मदत पुरवावी अशी मागणी काल चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना वंचित बहुजन युवा आघाडीच्या एका शिष्टमंडळाने लेखी निवेदन देवून केली आहे.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे ,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कविता गौरकार,या शिवाय माजी सरपंच मुरलीधर चुनारकर,शहर कार्याध्यक्ष सतिश खोब्रागडे, युवा उपाध्यक्ष संदीप दवे,छोटू दहेकर व अश्विन शेंडे उपस्थित होते.