Varora taluka @News
•वरोरा येथे शिवसेना( ठाकरे गटाच्या) भगवा सप्ताहाला उस्फुर्त प्रतिसाद
सुवर्ण भारत:खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा
वरोरा : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वे राज्यात सर्वत्र शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दि. ४ ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ‘ भगवा सप्ताह ’ साजरा करण्यात आला. या निमित्ताने वेगवेगळे तालुक्यांमध्ये सदस्य नोंदणी आणि जनजागरण अभियान राबविण्यात आले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करण्याची शिकवण दिली. हाच आदर्श समोर ठेवून समस्त शिवसैनिक पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्ष वाढविण्यासाठी अहोरात्र झटत आहे. गद्दार पक्षातून बाहेर पडले परंतु खरा सच्चा प्रामाणिक शिवसैनिक मात्र पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
आपण सर्व वं. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. आपले नेते उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात आपल्याला परस्परांत योग्य समन्वय व सामंजस्य ठेवून केवळ शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष वाढविण्यासाठी काम करायचे आहे. यामुळे यापुढे भेदभाव व गटबाजीला मुळीच थारा नाही . असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले.वरोरा व भद्रावती विधानसभा क्षेत्रात आपल्या पक्षासाठी पन्नास हजार सदस्य नोंदणीचे उद्दीष्ठ गाठण्यासाठी सर्वांनी सहकार्य द्यावे. अशा सूचना पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या.


