Ghugus City News
•घुग्घुस येथील कु.आर्थिका उपाध्ये ची गरुड झेप
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
घुग्घुस :एसीसी कॉलनी येथे राहणारी मुलगी कु.आर्थिका संजय उपाध्ये या कराटे पटू स्पर्धेत गरुड झेप घेतली आहे.
दि. ११ व १३ ऑगस्ट २०२४ रोजी बॅडमिंटन हॉल,जिल्हा क्रीडा संकुल, बारामती पुणे येथे राज्य स्तरीय कराटे स्पर्धा पार पडल्या.
स्पर्धेचे आयोजन कराटे अससोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटने द्वारे संघटनेचे अध्यक्ष युगेंद्रदादा पवार यांच्या मार्गदर्शनात पार पडल्या. सदर स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत कु. आर्थिका संजय उपाध्येनी एकतर्फी सामने जिंकत सुवर्ण पदक प्राप्त करीत राष्टीय स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली. येत्या नोव्हेंबर महिन्यात दिल्ली येथे होऊ घातलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आर्थिका महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
आर्थिका राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक सहज जिंकेल अशी आशा कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव शिहान रवींद्र कराळे यांनी व्यक्त केली.
आर्थिकाचे कोशल्य पाहून सौं. शर्मिलाताई पवार यांनी तिला मंच्याकडे बोलावून सत्कार केला.
आर्थिका कराटे मध्ये प्रथम दान ब्लॅक बेल्ट असून कराटे मध्ये अनेक पदके चंद्रपूर तसेच महाराष्ट्रासाठी जिंकले आहे.
आर्थिकाणे आपल्या यशाचे श्रेय पालक संजय रामचंद्र उपाध्ये व त्यांचे मातोश्री सौं.अनुराधा संजय उपाध्ये यांना दिले.आर्थिका शिहान विनय बबनराव बोढे,सेन्सेई मुहाफिज सिद्धीकी यांचेकडे कराटेचे नियमितपणे प्रशिक्षण घेत आहे.