Home Breaking News Chandrapur City News • नोंदणी केलेल्या व नवीन बांधकाम कामगाराची आर्थिक पिळवनूक...

Chandrapur City News • नोंदणी केलेल्या व नवीन बांधकाम कामगाराची आर्थिक पिळवनूक थांबवा: शिवसेना नेते ( शिंदे गट) बंडू पहानपटे यांची मागणी..!

224

Chandrapur City News
• नोंदणी केलेल्या व नवीन बांधकाम कामगाराची आर्थिक पिळवनूक थांबवा: शिवसेना नेते ( शिंदे गट) बंडू पहानपटे यांची मागणी..!

प्रतिनिधी :- संतोष झाडे
संपर्क: 9730526497

चंद्रपूर:-किरण पांडव पूर्व विदर्भ समन्वयक यांचे मार्गदर्शनात तसेच किशोर राय संपर्क प्रमुख चंद्रपूर जिल्हा व शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन देण्यात आले बांधकाम कामगार कल्याण मंडळ चंद्रपूर येथे नोंदणीसाठी बांधकाम कामगार हे कमी शिक्षण व अज्ञानाचा फायदा घेत ऑफिसच्या बाहेर दलाल सक्रिय होऊन हे रीनिवल साठी 1000 ते 2000 रुपये व नवीन नोंदणीसाठी 2000 ते 3000 रुपये घेऊन मजुरांची आर्थिक लूट करीत आहे, अशा तोंडी तक्रारी आमच्याकडे आल्या आहे.

सहाय्यक कामगार आयुक्त यांनी ही गैरसोय व आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी आपल्या कार्यालयात सेतू केंद्रकिंवा ऑनलाईन सर्विस त्वरित सुरू करून या शासनाच्या महत्त्वकांशी नाविन्यपूर्ण योजनाची बांधकाम कामगार यांना याचा लाभ मिळेल व होणारी आर्थिक लूट थांबेल या योजनेचा लाभ सर्व बांधकाम कामगारांना होऊन या योजनेपासून एकही पात्र बांधकामगार वंचित राहणार नाही. तरी आपण या पत्रावर सकारात्मक निर्णय घेऊन बांधकामगार यांना न्याय देण्याची काम करावे,अशी मागणी शिवसेनेचे शिंदे गटाचे चंद्रपूर उप तालुका प्रमुख बंडू पहानपटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.