• क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन
सुवर्ण भारत:खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी वरोरा
वरोरा : वरोरा तालुका माळी समाज सेवा मंडळ तर्फे 4 जानेवारी 2025 ला क्रांतीज्योती सावित्रीबाई fule जयंती निमित्य माळी समजाच्या कौटुंबिक सोहळ्याचे तसेच भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 11 वाजता भव्य मिरवणूक निघणार असून सदर मिरवणूक आशीर्वाद मंगल कार्यालयात पोहचेल. त्यानंतर सावित्रीबाई फुले जयंती व कौटुंबिक सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण भाऊ पवार अध्यक्ष महात्मा फुले शिक्षण संस्था नागपूर तसेच उदघाटक म्हणून आत्माराम जाधव संस्थापक अध्यक्ष संत सावता माळी नागरी सहकारी पतसंस्था पुसद, व किशोर भाऊ कन्हेरे उपाध्यक्ष काँग्रेस पक्ष, वासुदेवराव चौधरी प्रदेशाध्यक्ष राज्य माळी मिशन अमरावती, नंदू नागरकर माजी सभापती महानगरपालिका चंद्रपूर, विलास नेरकर वरोरा भद्रावती विधानसभा kshetr अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, दामूजी धावडे सामाजिक कार्यकर्ते नागपूर हे मान्यवर उपस्थित राहणार आहे. सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त समाज बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन राजू डोंगरे, प्रकाश बनकर, विठ्ठल बोबडे गोपाळ निंबाळकर, केशव लोठे, विलास सपाटे, रमेश लांजेकर, विनोद ढाकूलकर यांनी केलेले आहे.


