Home Breaking News • मूल नगरीत आज HOT SPOT CAFE रेस्टॉरंटचे थाटात उद्घाटन! • उद्घाटन...

• मूल नगरीत आज HOT SPOT CAFE रेस्टॉरंटचे थाटात उद्घाटन! • उद्घाटन सोहळ्याला नामवंत सहज सुचलं सावलीच्या मुख्य मार्गदर्शिका शैला चिमड्यालवार व समाजसेविका अर्चना समर्थंसह अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती !

150

• मूल नगरीत आज HOT SPOT CAFE रेस्टॉरंटचे थाटात उद्घाटन!
• उद्घाटन सोहळ्याला नामवंत सहज सुचलं सावलीच्या मुख्य मार्गदर्शिका शैला चिमड्यालवार व समाजसेविका अर्चना समर्थंसह अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती !

सुवर्ण किरण : किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)

मूल:मूल नगरीच्या मुख्य मार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या HOT SOPT CAFE रेस्टॉरंटचे आज थाटात उद्घाटन पार पडले.
गत वर्षी मूल लोकहितच्या वतीने देण्यात आलेल्या कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या पोर्णिमा किर्तीवार यांनी हे रेस्टॉरंट सुरू केलेले आहे.
किर्तीवार ह्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या एक सदस्य असून त्या मूल तालुक्यातील चिरोली या गावच्या मुळ रहिवाशी आहेत.
रविवारी पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्याला सावलीच्या सुपरिचित कवयित्री तथा सहज सुचलंच्या एक मार्गदर्शिका शैला चिमड्यालवार,मूल नगरीच्या समाजसेविका अर्चना समर्थ यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती लाभली होती.

ऐन वेळी महत्वाचे काम आल्यामुळे नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे व जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे ह्या उपरोक्त कार्यक्रमाला उपस्थित राहु शकल्या नाहीत परंतु उद्या त्या दोघींही रेस्टॉरंटला भेट देत असल्याचे पोर्णिमा किर्तीवार यांनी आज या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.