Home Breaking News • ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात राजमाता जिजाऊ जयंती • राजमाता...

• ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात राजमाता जिजाऊ जयंती • राजमाता जिजाऊंचे थोर कार्य महिलांसाठी प्रेरणादायी: किरण बोढे

187

• ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात राजमाता जिजाऊ जयंती

• राजमाता जिजाऊंचे थोर कार्य महिलांसाठी प्रेरणादायी: किरण बोढे

सुवर्ण भारत: पंकज रामटेके

सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस: येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात रविवार, १२ जानेवारीला राजमाता जिजाऊ माँसाहेब भोसले यांची तारखेप्रमाणे जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात आणि घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे यांच्या नेतृत्वात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. स्वामी विवेकानंद यांची जयंती. हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

मनोगत व्यक्त करतांना प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे म्हणाल्या, राजमाता जिजाऊ यांचे थोर कार्य महिलांसाठी प्रेरणादायी आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे १२ जानेवारी १५९८ रोजी राजमाता जिजाऊंचा जन्म झाला. जिजाऊ बालपणा पासून हुशार बुद्धीच्या होत्या. जिजाऊने शिवाजी महाराजांसारख्या थोर पुत्रास जन्म दिला. त्यांनी पुढे हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. आज राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठया उत्साहात साजरी केली जाते. राजमाता जिजाऊंना मी विनम्र अभिवादन करते.

यावेळी भाजपाच्या पुजा दुर्गम, सुचिता लुटे, वैशाली धवस, अमीना बेगम, सुनीता घिवे, सुनीता पाटील, नजमा कुरेशी, जयश्री राजूरकर, संगीता साबळे, भारती सोदारी, सुरेखा तोडासे, भावना धुपे, लता बेलेकर, आशा भंडारकर, सारिका भोंगळे, तुलसीदास धवस, राजेंद्र लुटे, हेमंत कुमार, सुनंदा लिहीतकर, संदीप तेलंग, हनुमान खडसे, भारती परते, स्वाती गंगाधरे, खुशबू मेश्राम, नेहा कुम्मरवार आदींची उपस्थिती होती