Home Breaking News #Jivti Taluka अशोक दिगांबर जाधव यांना महाराष्ट्र अभिमान पुरस्कार 2025 ने सन्मानित

#Jivti Taluka अशोक दिगांबर जाधव यांना महाराष्ट्र अभिमान पुरस्कार 2025 ने सन्मानित

220

#Jivti Taluka
अशोक दिगांबर जाधव यांना महाराष्ट्र अभिमान पुरस्कार 2025 ने सन्मानित

सुवर्ण भारत: कृष्णा चव्हाण उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर

जिवती — दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तींना यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपूर महाराष्ट्र आयोजित संस्थेकडून मागील 6 वर्षांपासून चंद्रपूर येथे पुरस्कार दिले जातात या वर्षी संस्थेकडून संपूर्ण महाराष्ट्रतुन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र अभिमान पुरस्कार 2025
देण्यात आले आहे त्यासाठी संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते रमेश जी बोरकुठे संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले या पुरस्कार साठी आदिवासी व ग्रामीण नक्षलक्षेत्रातील मानिकगढ पाहाडावरील पिटीगुडा नं 1 ता जिवती जिल्हा चंद्रपूर येथील या बंजारा गावातील अशोक दिगांबर जाधव राष्ट्रीय महासचिव ऑल इंडिया बंजारा टायगर्स यांना महाराष्ट्र अभिमान पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. अशोक जाधव यांना आता पर्यंत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, विभागीय स्तरावर, जिल्हा, तालुका, गावं पातळीवर आता पर्यंत 218 पुरस्कार मिळाले आहेत महाराष्ट्र शासन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाहु, फुले ,आंबेडकर पुरस्कार प्राप्त साईबाबा बहुउद्देशीय संस्था पिटीगुडा नं 1 ता जिवती जि चंद्रपूर व्दारा संचालीत युपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, तथा दिगांबर नाईक निवासी पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया येथील संस्थेच्या वतीने सन 2012-2013 पासून अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती व अल्पसंख्याक समाजातील निवासी पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया या जिल्ह्यात राबविण्यात आले आहे वाचनालय,ग्रंथालय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र संस्थेच्या वतीने ही योजना राबविण्यात येत आहे त्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यासाठी ऑल इंडिया बंजारा टायगर्स वतीने अल्पसंख्याक निवासी पोलिस भरती पुर्व संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक, संघटना कडून तथा महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटना कडून हार्दिक अभिनंदन शुभेच्छा दिल्या जात आहेत, चंद्रपूर येूथे कार्यक्रम अध्यक्ष सुनील कुमार मांडवे महामंत्री राष्ट्रीय डी के अरीकर अध्यक्ष पर्यावरण व विकास समिती महाराष्ट्र राज्य मा नंदगोपाल पांडे, रेल्वे ऐकता सेवा संघ महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे उद्घाटक ना.अशोक उईके आदीवासी मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर प्रमुख अतिथी विनय गौडा जिल्हाधिकारी चंद्रपूर मुमक्काम सुर्दशन पोलिस अधीक्षक चंद्रपूर प्रमुख पाहुणे मयुरी प्रमोदराव नेव्हते अभिनेत्री, रेशमी ढोलकीया ग्लोबल मिस युनिव्हर्स चंद्रपूर ,कार्यक्रमाचे संयोजक रमेश बोरकुठे अध्यक्ष यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपूर यांच्या वतीने महाराष्ट्र अभिमान पुरस्कार 2025 आयोजित प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर महाराष्ट्र येथे पुरस्कार देण्यात आले.