#Nadafata #korpna
• मे महिन्याचे धान्य – ३४९ शिधापत्रिकाधारकांचा प्रश्न सोडवणारे पुरवठा निरीक्षक विकी देवघरे यांचे कौतुक
सुवर्ण भारत: रविकुमार बंडीवार
कोरपना,प्रतिनिधी
नांदा फाटा (ता. कोरपना) येथील रेशन दुकानात मे महिन्यातील धान्य वितरणात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे उघडकीस आले होते. अनेक शिधापत्रिकाधारकांचे बिल काढले गेले नसून, ज्यांचे काढले गेले होते त्यांनाही रेशन मिळाले नव्हते. या परिस्थितीत तब्बल ३४९ शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित राहण्याच्या स्थितीत होते.
या गंभीर बाबीची दखल घेत कोरपना तालुक्याचे पुरवठा निरीक्षक अधिकारी श्री. विकी देवघरे यांनी तातडीने कारवाई करत सर्व शिधापत्रिकाधारकांना हक्काचे धान्य मिळवून दिले. त्यांच्या या तत्परतेमुळे अनेक गोरगरीब, विधवा, परितक्त्या महिला व नागरिकांचा दिलासा मिळाला आहे.
प्रत्यक्ष रेशन वितरणाच्या ठिकाणी नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला.
नांदा फाटा रेशन दुकानासमोर लाभार्थ्यांसह पुरवठा निरीक्षक अधिकारी विकी देवघरे व ग्रामपंचायत सरपंच सौं मेघा पेंदोर व कर्मचारी वर्ग उपस्तिथ होते
रेशन दुकान आज व उद्या सुरु राहणार असून, ज्या नागरिकांचे मे महिन्याचे बिल काढण्यात आले नव्हते, त्यांनी लवकरात लवकर रेशन दुकानात जाऊन धान्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“हक्काचे धान्य मिळाल्याने आमचा विश्वास पुन्हा जागा झाला आहे,” असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.


