Home Breaking News #warora • वरोऱ्यातील गांधी सागर तलावातील गाळ व खोलीकरण करण्याचा शुभारंभ संपन्न

#warora • वरोऱ्यातील गांधी सागर तलावातील गाळ व खोलीकरण करण्याचा शुभारंभ संपन्न

114

#warora
• वरोऱ्यातील गांधी सागर तलावातील गाळ व खोलीकरण करण्याचा शुभारंभ संपन्न

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी,चंद्रपूर

वरोरा :वरोरा नगरपरिषद वरोरा परिक्षेत्रातील गांधी सागर तलावातील गाळ व खोलीकरण करणे या कामाचा शुभारंभ ३० मे २०२५ ला सकाळी ११.०० वाजता खासदार प्रतिभा धानोरकर,आमदार करण देवतळे ,यांचे शुभ हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे,उपविभागीय अधिकारी अतुल जटाळे,तहसीलदार योगेश कौटकर,मुख्याधिकारी न.प.वरोरा विशाखा शेळकी , स्वच्छता निरीक्षक भूषण सालवटकर व सामाजिक ,राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.

शहरातील तलाव परिसर हा ५० एकराचा असून,शहराचे मध्यभागी आहे.शहराचे एक भूषणावह म्हणून तलावाकडे पाहिले जाते.तलावाचे खोलीकरण केल्यानंतर पाण्याची पातळी वाढणार तसेच तलाव खोलीकरण करून सौंदर्यीकरण करणे आदि कामे पूर्णत्वास नेणे,
एकंदरीत वरोरा शहराचा विकास साधण्यासाठी खासदार ,आमदार यांनी समन्वयाची साद घातली आहे.
तलाव खोलिकरणाने पाणीसाठा तर वाढणारच सोबतच परिसरातील पाणी टंचाई दूर होईल.तलावाचे सौंदर्यीकरण झाल्याने पर्यटक या ठिकाणी येईल.भविष्यात पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येईल.

तलाव खोलीकरण शुभारंभ प्रसंगी आपल्या मार्गदर्शनात आमदार करण देवतळे यांनी शहराच्या मध्यभागी तलाव असून तलाव खोलीकरण व गाळ काढल्यास पाण्याची पातळी वाढविण्यास मदत होऊन शहरातील नागरिकांची पाण्याची समस्या दूर होईल, आणि खोलीकरणामुळे निघालेली माती शहरालगतच्या शेतकरी बांधवांच्या शेतात टाकल्यास जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल.असे प्रतिपादन त्यांनी केले.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या मार्गदर्शनात गांधी सागर तलाव हा महसूल विभागांतर्गत येत असल्याने नगरपरिषद वरोऱ्याला हस्तांतरित झाल्यास न.प. ला प्राप्त होणाऱ्या विकास कामाचे विविध निधीतून तलाव सौंदर्यीकरण करून पर्यटनला चालना मिळेल असे प्रतिपादन केले.

सदर काम अंबुजा फाउंडेशन चंद्रपूर यांचे माध्यमातून करण्यात येत आहे.तद्वतच तलावातील काढण्यात येत असलेला गाळ व माती शेतकरी बांधवांनी शेतात टाकण्याकरिता घेऊन जावे असे प्रतिपादन.मुख्याधिकारी न.प.वरोरा डॉ.विशाखा शेळकी यांनी केले.

उपरोक्त शुभारंभ कार्यक्रमाचे संचालन उमेश कथडे प्रकल्प अधिकारी न.प.वरोरा,प्रास्ताविक अंबुजा फाउंडेशन चंद्रपूर विशाल भोगावार,आभार प्रदर्शन मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी यांनी केले.
सदर कार्यक्रमाकरिता सर्व न.प.अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.