• खरीप हंगामात बियाणे, खते खरेदी करताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी .
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी वरोरा
वरोरा : सध्या खरीप हंगामाला सुरुवात झालेली असून शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणावर बी बियाणे व खतांची खरेदी सुरू आहे शेतकऱ्यांनी बी बियाणे व खते हे अधिकृत कृषी केंद्रामधूनच विकत घ्यावी. कृषी केंद्रामधून विकत घेत असताना बियाण्याचे नाव, वाणाचे नाव, कंपनीचे नाव, लॉट नंबर, बियाण्याची किंमत हे नमूद असलेले पक्के बिल घेऊनच बियाण्याची खरेदी करावी. कुठल्याही प्रकारच्या कच्या बिलावर बियाणे खरेदी करू नये .घेतलेले पक्के बिल हे शेतकऱ्यांनी सांभाळून ठेवावे, जेणेकरून पुढे जाऊन खते, बियाण्याबाबत काही समस्या उद्भवल्यास आपल्याला कृषी विभागाकडे तक्रार दाखल करता येईल. शेतकऱ्यांनी कुणाच्याही भूलथापांना बळी पडून गावामध्ये येणाऱ्या अनधिकृत इसमांकडून कुठल्याही प्रकारचे बियाणे, खते खरेदी करू नये .असे बियाणे , खते खरेदी केल्यास आपली फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असे बियाणे, खते अनधिकृतपणे विकण्याचा कुणी प्रयत्न करीत असल्यास कृषी विभागास याबाबतची माहिती द्यावी असे आव्हान पंचायत समिती वरोराचे कृषी अधिकारी श्री गजानन हटवार(मोबाईल क्रमांक 7588073253/8999486384)यांनी केले.


