#Varora
• अ.भा.भो.सेवा संस्था गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार…….
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा
वरोरा: अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था तर्फे वरोरा तालुक्यातील सालोरी या गावात बैठक घेण्यात आली
ही बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.
या बैठकीमध्ये समाज प्रबोधन मार्गदर्शन करण्यात आले मग गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला
भोई समाजातील दहावी बारावी, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व पेढा भरवून तसेच
विद्यार्थ्यांना भेट वस्तू देऊन सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा सर्व पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या. यावरून असं लक्षात येते की भोई समाजातील मुल मुली यांना सुद्धा शिक्षणात आवड आहे. त्यांच्याही अंगी जिद्द व चिकाटी आहे शिकून काहीतरी करण्याची इच्छा नक्कीच या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येते ध्येय उंच असलं की झेप सुद्धा उंचच घ्यावी लागते.आपलं ध्येय आपण ठरवायचं हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेच्या युगात टिकाव आपल्या मुलांना घडवायचं असेल तर त्यांचे पंख फुटू द्या, त्यांची शक्ती त्याला मिळू द्या ,तेव्हाच ते भरारी घेतील असे मार्गदर्शन सौ.अलकाताई पचारे यांनी विद्यार्थ्यांना केले
या बैठकीला अ.भा.भो.समाज सेवा संस्थेच्या विदर्भअध्यक्षा अल्काताई पचारे तसेच
जिल्हाध्यक्ष शिल्पा रुयारकर अ.भा.भो.सेवा संस्था.
रंगनाथ पवार जिल्हा उपाध्यक्ष अ.भा.भो.सेवा संस्था.
संदीप मोरे जिल्हा सरचिटणीस अ.भा.भो.सेवा संस्था गणेश तुमसरे, अमोल तुमसरे सालोरी गावातील गावकरी व महिला पदाधिकारी उपस्थित होते


