#Chandrapur
• धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड व पहेल मल्टीपर्पज सोसायटीच्या संयुक्त उपक्रमातून ताडाळी ग्रामपंचायतीला साउंड सिस्टम वितरण.
सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर : धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड व पहेल मल्टीपर्पज सोसायटी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत ताडाळी येथे साउंड सिस्टमचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम मा. देवेश कुमार (मुख्य महाप्रबंधक, धारिवाल) यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील नागरिकांपर्यंत महत्वाची माहिती, सरकारी योजना व जनजागृती विषयक संदेश पोहोचविण्यासाठी ही साउंड सिस्टम उपयुक्त ठरणार आहे. या यंत्रणेमुळे गावकऱ्यांमध्ये अधिक सजगता व सहभाग निर्माण होण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमास डॉ. अनीष नायर (मुख्य व्यवस्थापक, धारिवाल), निखिलेश चामरे (सरपंच, ग्रामपंचायत ताडाळी) तसेच इतर कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये दिनेश कामतवार, अंजुषा काकडे, माधुरी श्रीवास्तव, श्रेया, शीतल आणि साक्षी यांचे मोलाचे योगदान लाभले.


