Home Breaking News • राजूरा उपविभागातील काही पटवारी फक्त एक दोनच दिवस मुख्यालयात राहतात? आदिवासी...

• राजूरा उपविभागातील काही पटवारी फक्त एक दोनच दिवस मुख्यालयात राहतात? आदिवासी नेते वामन आत्राम यांचा आरोप ! • चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना लेखी तक्रार सादर!

81

• राजूरा उपविभागातील काही पटवारी फक्त एक दोनच दिवस मुख्यालयात राहतात? आदिवासी नेते वामन आत्राम यांचा आरोप !
• चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना लेखी तक्रार सादर!

सुवर्ण भारत:किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर:विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, कोरपना व राजूरा तालुक्यातील काही पटवारी मुख्यालयाला नियमित उपस्थित राहात नाही. त्यामूळे शेतक-यांना बराच ञास सहन करावा लागत आहे.आठवड्यात ते पटवारी फक्त एक दोन दिवसच मुख्यालयी राहत असल्याचा आरोप आदिवासी नेते तथा नागविदर्भ आदिवासी महासंघाचे अध्यक्ष वामन आत्राम यांनी केला आहे.
बॅकेतून पिक कर्ज घेणे, उत्पन्न दाखला घेणे आदिं आवश्यक कामे पटवारी वर्गांकडे राहत असल्याचे आत्राम यांचे म्हणणे आहे.
ते वेळेवर मिळत नाही .त्यामुळे विनाकारण शेतकऱ्यांसह सर्व सामान्य जनतेला नाहक त्रास करावा लागत आहे .आज त्यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या कडे लेखी तक्रार दाखल केली आहे.