Home Breaking News #Nagbhid • बच्चू कडूंच्या ‘अन्नत्याग ‘आंदोलनाचे नागभीड तालुक्यामध्ये पडसाद

#Nagbhid • बच्चू कडूंच्या ‘अन्नत्याग ‘आंदोलनाचे नागभीड तालुक्यामध्ये पडसाद

194

#Nagbhid
• बच्चू कडूंच्या ‘अन्नत्याग ‘आंदोलनाचे नागभीड तालुक्यामध्ये पडसाद

सुवर्ण भारत:कृष्णा चव्हाण
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

नागभीड : कष्टकरी शेतकरी शेतात राब राब राबून एका दाण्याचे 100 दाणे करतो आणि त्या पिकवलेल्या दाण्याचे भाव सरकार जर पाळत असेल आणि तरीही आपण शांत बसत असेल तर काही अर्थ नाही कुठेतरी या सरकार विरोधात आपण पेटून उठलं पाहिजे असा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बच्चू कडूं यांनी सत्तेत असलेल्या भाजप सरकारवर करून महाराष्ट्रातील तमाम शेतकरी जनतेला शेतमजुरांना दिव्यांगांना या आंदोलनात सहभागी होऊन महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात गाव खेड्यात शहरात बच्चू कडूच्या या आंदोलनाला साथ द्या असे आव्हान कार्यकर्त्यांना केले व हे आंदोलन शेतकरी – शेतमजूर दिव्यांग व्यक्तींना जगला पाहिजे यासाठी असल्याची भूमिका बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनातून मांडली.

शेतकऱ्याची कर्जमाफी देण्यात यावी दिव्यांगांना दर महिन्याला सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे या प्रमुख मागण्यासह आणि अन्य मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने शुक्रवार दिनांक 13/06/2025 ला तहसील कार्यालय नागभीड तहसीलदार साहेब प्रताप जी वाघमारे आणि पोलीस स्टेशन नागभीड तालुकाप्रमुख वृषभ भाऊ खापर्डे यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये निवेदन देण्यात आले.

8 जून पासून माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी शेतमजुराच्या व दिव्यांगाच्या रास्त मागण्यासाठी अन्य त्याग आंदोलनाला सुरुवात केली दुपारी गाडगे महाराज यांच्या समाधीला अभिवादन करून थेट बैलगाडीने बच्चू कडू गुरुकुंज मोझरी येथील नियोजित आंदोलन स्थळी दाखल झाले याचे पडसाद आज नागभीड तालुका भर पडल्याने त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते देखील दुचाकी रॅलीने आंदोलन स्थळी दाखल झाले.
गुरुकुंज मोझरी येथे बैलगाडीने दाखल होताच बच्चू कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं त्यांच्या समाधीला अभिवादन केले व त्यानंतर आंदोलनाच्या मंडपात राष्ट्रध्वज तिरंगा फडकवून व त्यांचे पूजन करून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली यावेळी बच्चू कडू यांनी जाहीर सभेतून कार्यकर्त्यांशी संवाद साधून आंदोलन मागण्याची भूमिका मांडली यामध्ये त्यांनी निवडणूक काळात भाजपा ने सत्तेवर येण्यासाठी शेतकरी जनतेला कर्जमाफी देऊ शेतमालाला भाव देऊ असे अनेक आश्वासने दिली होती मात्र सत्तेवर येतात या सर्व आश्वासनाच्या या भाजप सरकारला विसर पडला.

सत्तेवर येण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली जाते आणि नंतर माझ्या शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या शेतमालाला भाव पाडल्या जाते त्याचे आपण दुसऱ्या अर्थाने संशोधन करण्याची गरज असल्याची बच्चू कडू यांनी जाहीर सभेतून सांगितले.

निवेदन देताना यावेळी उपस्थित प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष वृषभ खापर्डे, उपाध्यक्ष सुधाकर मेंडुलकर, युवा तालुकाप्रमुख पप्पू देशमुख, विद्यार्थी तालुका अध्यक्ष, नागेश कावडे, गुरुदेव चंदन बावणे अक्षय खोब्रागडे नरेश मेश्राम, कुणघाडा चक येथील शाखाप्रमुख हिवक दडमल, युवा शहर नागभीड तालुका मुख्य प्रवक्ते देवानंद गायधने दिव्यांगा तालुका अध्यक्ष प्रमोद भाऊ डोंगरे दिवाकर मेश्राम, मनोहर कोळपे परमेश्वर मोहजनकार अरविंद खेडेकर आणि इतर प्रहारसेवक उपस्थित होते