Home Breaking News • सुप्रसिद्ध अवघ्या तेरा वर्षाच्या बालकलाकारांचे वरोऱ्यात किर्तन • शीतला माता...

• सुप्रसिद्ध अवघ्या तेरा वर्षाच्या बालकलाकारांचे वरोऱ्यात किर्तन • शीतला माता मंदिर सेवा समितीचे आयोजन

152

• सुप्रसिद्ध अवघ्या तेरा वर्षाच्या बालकलाकारांचे वरोऱ्यात किर्तन

• शीतला माता मंदिर सेवा समितीचे आयोजन

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा : येथील शीतला माता मंदिर सेवा समिती,विश्वास नगर, इंद्रप्रस्थ ले आउट टिळक वॉर्ड वरोरा,चे वतीने वर्षभऱ्यात सामाजिक,व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जातात.
शीतला माता मंदिर सेवा समितीचे वतीने १५ जून २०२५ ला ह.भ.प.यश राजू चिंचोलकर महाराज यांचा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम १५ जून २०२५ ला सायंकाळी ७.०० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.समितीचे सुधाकर कुंकुले,भानुदास राऊत,प्रदीप पाटील,नरेश बोभाटे,अतुल माहुलकर,अनिल चौधरी,अनिल बागल,नारायण धारणकर,हितेश बोढेकर,जयंत कथलकर ,भोगेकर या समिती सदस्यांनी जनतेनी बाल कीर्तनकारांच्या सुश्राव्य कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

बाल कीर्तनकार अवघ्या १३ वर्षाचा
बालकिर्तंनकार यश राजू चिंचोलकर हे भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील रहिवासी असून, वरोऱ्यातील हिरालाल लोया विद्यालयात सातव्या वर्गात शिक्षण घेत आहे.वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिबिर मोझरी येथे आयोजित करण्यात आले होते.सदर शिबिरात ६०० मुलांनी सहभाग घेतला होता.त्यामध्ये कीर्तनाची तालीम घेण्यात आली,तर ६०० विद्यार्थ्यांमधून बालकीर्तनकार यश याचा पहिला क्रमांक आला.चंद्रपूर, नंदोरी , टाकळी,मार्डी याठिकाणी त्यांचे कीर्तन झाले.त्याला ध्यान,साधना,प्रार्थनेचा ध्यास असल्याचे त्याचे आजोबा दादाजी चिंचोलकर यांनी माहिती दिली.