• आनंदवन येथे विद्यार्थ्याना साहित्याचे वाटप
• चैतन्य सोशल वेल्फेअर फाउंडेशन मुंबई ,संस्थेचा स्तुत्य उपक्रम
• डॉ.विकास आमटे यांचे हस्ते शालेय किट्स चे वितरण
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा
वरोरा : चैतन्य सोशल वेल्फेअर फाउंडेशन मुंबई या संस्थेने आनंदवन मधील आनंद माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना १४ जून २०२५ ला आनंदवनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता.महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ.विकास आमटे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला असून त्यांचे व कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचे हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
महारोगी सेवा समिती संचालित आनंद माध्यमिक विद्यालयाची स्थापना २०१८ ला करण्यात आली.गोरगरिबांच्या मुलांना घरापासून दूर अंतरावरील शाळेत जाणे परवडण्यासारखे नव्हते.त्यामुळे मुलांना घरापासून जवळच्या अंतरावरील शाळेत शिकता यावे यासाठी मुले शिकली पाहिजे,शिकून मोठी झाली पाहिजे या उदात्त हेतूने व मुले शिक्षण प्रवाहात यावी हा दूरदृष्टीकोण ठेऊन डॉ.विकास आमटे यांनी शाळेची स्थापना करून शिक्षणाची सोय केली.शाळेमध्ये नववी व दहावी असे दोन वर्ग असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुले याठिकाणी शिक्षण घेत आहे. विद्यार्थ्यांचे करिअर घडावे यासाठी शाळा व्यवस्थापन समिती विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्याबाबत सदोदित मार्गदर्शन करीत असतात.शाळेमध्ये विषयानव्ये पारंगत शिक्षकांचा संच असून विद्यार्थी घडविण्याकडे त्यांचा कल असतो.
शालेय किट्स वाटप कार्यक्रमाला चैतन्य फाऊंडेशनचे प्रथमेश तेंडुलकर,दिपाली तेंडुलकर,अंजली देशपांडे,राजेंद्र देशपांडे, आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू,डॉ.विजय पोळ,जेष्ठ कार्यकर्ते माधव कवीश्वर,राजेश ताजने,योगिनी पाटील,मुख्याध्यापिका विद्या गोखरे (टोंगे) आणि शाळेचे शिक्षकवृंद उपस्थित होते. महाराष्ट्रभर चैतन्य सोशल वेल्फेअर फाउंडेशन मुंबई ह्या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप होत असतात असे प्रतिपादन संस्थेचे राजेंद्र देशपांडे यांनी केले आहे.
डॉ.विकास आमटे यांनी स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा दिल्याच यातच दहावीच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील उत्तम संधी शोधून चांगले करिअर घडविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करताना विश्वस्त सुधाकर कडू यांनी संस्थेबद्दल आणि शलेबद्दलची माहिती विशद करून चैतन्य फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले.


