
#Chandrapur
नटराज इंग्रजी मीडियम स्कूल अष्टभुजा येथे असेस टू जस्टिस प्रकल्पाची बालकांच्या संरक्षणावर कार्यशाळा संपन्न
सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
चंद्रपूर:असेच टू जस्टिस प्रकल्प चंद्रपूरच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यात बालकांच्या संरक्षणार्थ शासन व प्रशासनासोबत हृदय संस्था गडचिरोली नियमित कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार लैंगिक अत्याचार, बालविवाह, बालमजुरी, ह्यूमन ट्राफिकिंग, बालकांसाठी असणारा शासकीय योजनांना मदत मिळवून देणे या विषयावर सातत्याने गत दोन वर्षांपासून कार्यरत असलेली संस्था, जिल्हाभरात शाळा व महाविद्यालयांमध्ये अल्पवयीन बालिका किशोरवयीन बालक बालिका यांच्यासाठी सातत्याने गत तीन वर्षा पासून जनजागृती कार्यक्रम करीत आहे. त्याच अनुषंगाने नटराज इंग्रजी माध्यमिक शाळा अष्टभुजा वॉर्ड चंद्रपूर येथे या संपूर्ण विषयावर एक कार्यशाळा बालकांसोबत घेण्यात आली त्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून शशिकांत मोकाशे क्षेत्रीय अधिकारी असेच तू जास्तीच प्रकल्प चंद्रपूर, शाळेच्या प्राचार्या सिमा,सरकार , शिवसेना शहर महिला आघाडी प्रमुख वाणी सदालवार, शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका मीनाक्षी मलिक कन्हैया कार्यक्रमात मंचावर उपस्थित होते .
त्याप्रसंगी 600 बालकांच्या मध्यस्थीत शाळेच्या पटांगणात सदर भव्य कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी बालक आणि त्यांचे पालकही उपस्थित असल्याचे निदर्शनास आले बालकांना गुड टच बॅड टच ट्रिकी टच हा काय प्रकार असतो व प्रलोभन देऊन बालकांना कशा पद्धतीने बालक बळी पडतात याची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली.
त्यास प्रसंगी मोबाईलचा वापर आणि त्याचे दुष्परिणाम मोबाईल मुळे होणारे अडचणी , स्क्रीन ऍडिक्शन, बालविवाह आणि त्याचे परिणाम बालविवाद सामील होणाऱ्यांना काय शिक्षेची तरतूद आहे व त्यासाठी कोणकोणत्या यंत्रणेचा व कसा वापर केला जातो लैंगिक अत्याचार पासून बालकांचे संरक्षण कायदा काय आहे आणि त्यात काय शिक्षेच्या तरतूद केलेल्या त्यापासून बालिकेच्या जीवनात काय परिणाम होतो त्यानंतर उद्भवणारी परिस्थिती काय असते शासनाने दिलेले बालकांसाठी व महिलांसाठी टोल फ्री क्रमांक काय त्याचा वापर कधी कसा करावा, बालकांसाठी शासन दरबारी कोणकोणत्या विभागांमध्ये बालकांची काळजी आणि योजनांवर सरकार काम करते याबाबतची माहिती देण्यात आली यासंदर्भात सविस्तर व सखोल मार्गदर्शन हसत-खेळत करण्यात आले शेवटी शालेय प्रशासनाने मार्गदर्शक शशिकांत मोकाशे यांचे आभार मानून सदर कार्यक्रमाला पूर्णविराम दिला या प्रकारची कार्यशाळा नियमित घेण्यात यावी अशी प्रशासनाने अपेक्षाही दर्शविली. याप्रसंगी बालविवाह शपथ कार्यक्रम घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या वर्ग शिक्षकांनी तर आभार प्रदर्शन एका बालिकेने सुंदर अशा शब्दात केले. या कार्यक्रमाच्या उपलब्धीसाठी व यशस्वीतेसाठी शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व सहकार्य करून कार्यक्रमाची शोभा वाढविली


