#Ghugus
•आषाढी एकादशी निमित्त घुग्घूस ते वढा पायदळ वारी

• भारतीय जनता पार्टी तर्फे वारकऱ्यांचे स्वागत व काॅफी वाटप
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
घुग्घूस : देवशयनी आषाढी एकादशी निमित्त समस्त गावकरी मंडळी व तेली समाज बहुउद्देशीय संस्था घुग्घूस यांच्या वतीने गांधी चौकशी घुग्घूस येथून दिनांक ६ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता वारी विदर्भाची काशी तीर्थक्षेत्र वढा करीता भजन मंडळ टाळ मृदूंग व विठ्ठल नामाच्या गजरात निघाली
सदर वारीचे विठ्ठल माऊली ज्वेलर्स समोर चंद्रपूर मतदारसंघातील लोकप्रिय आ.किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात भा.ज.पा.नेते आशीष मासिरकर यांच्या वतीने स्वागत करण्यात आले व वारकऱ्या करीता काॅफी पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
याप्रसंगी भाजप नेते आशिष मासिरकर,माजी.सरपंच संतोष नुने,स्वप्नील वाढई, सुचिता लुटे,सुनिता पाटील, दिलीप खांडारकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


