माथोली, जुगाद गाव आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या भक्तीने दुमदुमले
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी,चंद्रपूर
यवतमाळ:६ जुलै २०२५ रविवार सकाळ रोजी आषाढी एकादशीनिमित्त कैलाश नगर येथे वारीचे आयोजन करण्या

त आले,या वारीत कैलाश नगर शिव मंदिर ते यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध हेमाडपंथी काळातील शिव मंदिर जुगाद विठ्ठल,रुक्मिणीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
या वारीत टाकळी येथील भजन मंडळ व कैलाश नगर,जुगाद, माथोली,चिखली,सावंगी येथील सर्व भजन मंडळ व भक्तजन एकत्रित येऊन हि वारी माथोली, कैलाश नगर,साखरा ते जुगाद पायदळ वारी काढण्यात आली होती, तसेच काढलेली वारी अतिशय आनंदाने पार पडली, परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला व महिलांच्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते, विठू माऊलींच्या दर्शना सोबतच महादेवाचे दर्शन ही करण्यात आले व शिवमंदिर येथे भजन ही झाले व पालखी सोहळा पूजास्थान करून समारंभ करण्यात आले.


