पीएमश्री घुग्घुस कन्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सौ. सोनू कामतवार

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
घुग्घूस : पीएमश्री शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सौ. सोनूताई कामतवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. सोनूताई कामतवार यांच्या अध्यक्षतेखाली 2025-26 या शैक्षणिक वर्षातील पहिली पालक सभा आयोजित करण्यात आली. या सभेत विविध समित्या गठीत करण्यात आल्या.
2025-26 ते 2026-27 या दोन वर्षाच्या कार्यकाळासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सौ.सोनुताई कामतवार , उपाध्यक्षपदी प्रणाली ब्राह्मणे, विद्यार्थी प्रतिनिधी ईश्वरी अडबाले, सचिवपदी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कामडे, शिक्षक प्रमुख श्री रोशन काळे, शिक्षणप्रेमी सौ. वर्षा राखुंडे यांची निवड करण्यात आली.तसेच सौ.सोनाली कटारे, सौ दुर्गा पचारे, सौ.रंजना अडबाले, सौ.सोनी खेडेकर,सौ. वेणूताई मडकाम, सौ.रेखा आत्राम यांची सदस्य म्हणून आणि हरिदास जुनारकर यांची पालक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.
त्याचप्रमाणे सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती स्थापन करण्यात आली. नूतन अध्यक्षा सौ.कामतवार यांनी सर्वांच्या सहकार्याने शाळेच्या विकासासाठी आदर्शवत काम करूया असे सांगितले. सहाय्यक शिक्षिका सौ. शामला तरवटकर यांनी सूत्रसंचालन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनिषा कामडे यांनी प्रास्ताविक केले. सौ.अल्का राठोड यांनी सर्वांचे आभार मानले.


