#Ballarpur
• महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर वंचीतचा “आक्रोश मोर्चा”


सुवर्ण भारत : विशाल डुंबेरे (जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर)
बल्लारपूर : वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी बल्लारपूर शहर द्वारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर “आक्रोश मोर्चा” शहराध्यक्ष उमेश कडू यांच्या नेतृत्वात काढण्यात आला मोर्चाचे सूत्रसंचालन महिला शहराध्यक्ष रेखाताई पागडे यांनी केले या मोर्चात विशेष करून 24 तास पाण्याची मागणी करण्यात आली तसेच सरासरी बिल आकारणी करण्यात यावी, एक वर्षासाठी अभययोजनेची मागणी शहराध्यक्ष उमेश कडू यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे
शहरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाद्वारे बल्लारपूर शहरात पाणीपुरवठा अशुद्ध व गढूळ असल्यामुळे तसेच अवास्तव बिल आकारणीने नागरिक त्रस्त आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ने पंधरा दिवस च्या आत मान्य करा अन्यथा ग्राहक न्यायालयाच्या माध्यमातून लढा पुढे सुरू ठेवत न्यायहक्कासाठी भांडू असा इशारा या वेळेस वंचित बहुजन आघाडी ने दिला सोबतच उपस्थित ग्राहकांना का सांगण्यात आले की 15 जुलैला दुपारी एक वाजता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गेटवर वंचित बहुजन आघाडी तक्रार संकलन शिबिर सुद्धा लावणार आहे त्यामुळे आपण आपल्या वार्डात जाऊन ज्या नागरिकांना समस्या आहे त्यांना याविषयी सांगावे असे आवाहन करण्यात आले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला चे वरिष्ठ अधिकारी कटके यांना निवेदन देण्यात आले व या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष प्रभू दाजी देवगड यांनी केले, याप्रसंगी महासचिव गौतम रामटेके, संघटक राकेश पेटकर, प्रियंकेश शिंगाडे, किरण रामटेके, नम्रता साव, सविता थुलकर , पंचावेले, प्रतिमा खेकारे, देवराम नंदेश्वर, परमानंद भडके, अशोक जी भावे, आदी कार्यकर्ते तसेच नळग्राहक मोठ्या संख्येत उपस्थित होते


