Beed Dist @
• आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा गावचे सुपुत्र भागीरथ धारक यांची प्रभारी नायब तहसीलदारपदी नियुक्ती—
• संयम, प्रामाणिकपणा आणि जनसंपर्कातून मिळवलेला गौरव!
•

आमदार सुरेश धस, माजी आमदार साहेबराव दरेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडुन अभिनंदन—
सुवर्ण भारत : बीड जिल्हा प्रतिनिधी– गोरख मोरे
80 87 17 57 12
शांत,समंजस आणि सर्वसामान्य जनतेशी प्रभावी संवाद साधणारे तसेच पारदर्शक प्रशासनाची कास धरणारे अधिकारी म्हणून ओळख असलेले आष्टी तालुक्यातील (जिल्हा बीड) मौजे धानोरा गावचे सुपुत्र भागीरथ धारक यांची नुकतीच प्रभारी नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती मिळाली . त्यांच्या या नव्या जबाबदारीनंतर आष्टी /पाटोदा /शिरुर कासार मतदार संघाचे आमदार सुरेश धस, माजी आमदार साहेबराव दरेकर यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडुन अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी आष्टीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्या हस्ते भागीरथ धारक यांना सन्मानित करण्यात आले .
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सतिश आबा शिंदे,एसबीआय शाखा व्यवस्थापक राकेश शाही,डॉ.नदिम शेख,शिवनाथ राऊत,डॉ लाड,डॉ.जरांगे,ॲड रिजवान शेख,दिपक भुजबळ,मुस्तफा शेख,माजी सरपंच बुचुडे,सरपंच सागर भाऊ दरेकर,संतोष वाळके व असंख्य मान्यवर उपस्थित होते .
तसेच उपस्थित मान्यवरांमध्ये निवासी नायब तहसीलदार जयदत्त चव्हाण, नायब तहसीलदार सिरसेवाड नाना, पडोळे मॅडम,तसेच विविध खात्यांतील अधिकारी,तहसील कर्मचारी,ग्रामपंचायतीतील पदाधिकारी आणि गावकऱ्यांचा सहभाग या ठिकाणी दिसुन आला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून
दैनिक झुंजार नेता चे उपसंपादक व जेष्ठ पत्रकार उत्तमराव बोडखे,दैनिक सकाळचे पत्रकार निसार शेख,युवा सोबतीचे पत्रकार जावेद पठाण, बीड जिल्हा प़तिनिधी–पत्रकार गोरख मोरे , लोकशाही पत्रकार संघाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब साबळे आदी जन आवर्जुन उपस्थित होते .
या सोहळ्याच्या निमित्ताने कार्यक्रमात शिस्त,सौजन्य,आणि सामाजिक समरसतेचे उत्कृष्ट दर्शन या ठिकाणी दिसुन आले
भागीरथ धारक यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रामाणिकपणे, पारदर्शक आणि जनतेच्या हितासाठी सतत चांगल्या कामाचे प्रयत्न केले.त्यांच्या पदोन्नतीने प्रशासनात नवा विश्वास निर्माण झाला असून,पुढील वाटचालीतही ते न्याय आणि जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरतील, असा विश्वास सर्व स्तरातील मान्यवरांनी या प्रसंगी व्यक्त केला .



