Home Breaking News #Ballarpur • वेल्डींग वर्कशॉपचा ताला तोडुनारे चोरट्याला बल्लारपूर गुन्हेशाखा पोलिसाने घेतले ताब्यात

#Ballarpur • वेल्डींग वर्कशॉपचा ताला तोडुनारे चोरट्याला बल्लारपूर गुन्हेशाखा पोलिसाने घेतले ताब्यात

97

#Ballarpur
• वेल्डींग वर्कशॉपचा ताला तोडुनारे चोरट्याला बल्लारपूर गुन्हेशाखा पोलिसाने घेतले ताब्यात

सुवर्ण भारत:शंकर महाकाली(संपादक)

बल्लारपूर : विनयकुमार विश्वकर्मा वय २१ वर्ष धंदा वे

ल्डींग दुकान राहणार मौलाना आझाद वार्ड, बल्लारपुर यांनी पोलीस ठाणे, बल्लारपुर रिपोर्ट दिली दिनांक ०३ जुलै रोजी दरम्यान त्यांचे मालकीचे वेल्डींगचे वर्कशॉप चा ताला तोडुन वर्कशॉपमधील १. एक अॅम्पीलफायर किं. १०,०००/- रू २. एक साउन्ड बॉक्स किं अं. ७००/-रू ३. लोहा कापण्याचे ब्लेड एक बॉक्स किं.अं. ६००/- रू. ४. एक पाना पेंचीस सेट किं.अं. १५००/- रू ५. लोखंडी अँगल, पट्टी, रॉड किं.अं. ३०००/- असा एकुण १५,८००/- रू चा माल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे असे फिर्याद वरून पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी व चोरीस गेले मालाचा शोध घेतला असता आरोपी नामे कुणाल वर्मा, वय २३ वर्ष, रा. सुभाष वार्ड, बल्लारपुर २) करण उर्फ शंकर दुपारे वय २२ वर्ष रा. ऐनबोडी ता. बल्लारपूर यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. वर नमुद आरोपीतांना विश्वासात घेवुन त्यांचकडे तपास केला असता चोरी गेलेल्या सर्व मुद्देमाल आरोपी कडुन जप्त करण्यात आला  आणि आरोपीवार गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर ची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन अपर पो. अधिक्षक ईश्वर कातकडे, सुधाकर यादव सा. उपविभागिय पो अधिकारी, राजूरा व पोलीस निरिक्षक बिपीन इंगळे, यांचे मार्गदर्शनात सपोनि मदन दिवटे, सफौ. आनंद परचाके, पोहवा. रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, संतोष पंडीत, सुनिल कामतकर, पुरूषोत्तम चिकाटे, पो. अंमलदार शरदचंद्र कारूष, विकास जुमनाके, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, भास्कर चिचवलकर, सचिन राठोड, म.पो. अंमलदार अनिता नायडू, इत्यादी पो. स्टाफ यांनी अतिशय कुशलतेने गुन्हा उघडकीस आणला आहे.