Home Breaking News ⬜अण्णाभाऊ साठे ⬜

⬜अण्णाभाऊ साठे ⬜

126

⬜अण्णाभाऊ साठे ⬜

अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध लेखक लोककवी आज त्यांची जयंती त्यांना माझे विन्रम अभिवादन!
त्यांचा जन्म एक ऑगस्ट १९२० वाटेगाव येथे झाला. मांग समाजात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालबाई. त्याकाळी प्रचंड जातीभेद होता या लोकांच्या बद्दल खूप दुस्वास होता त्यामुळे या लोकांना खूप त्रास दिला जायचा त्यामुळे शिक्षणाची आवड असूनही त्यांची शाळा दीड दिवसाची झाली याला एकमेव कारण म्हणजे भेदभाव. पण बुद्धीचे तेज असेल तर ते कधीच लपत नाही.

त्यांचे जीवन खूप कष्टप्रद गेले पण जीवनाकडे त्यांनी कधीही फार मानले नाही. अनेक पटकथा पोवाडे कथा प्रवास वर्णन लोकनाट्य कादंबरी असे त्यांचे लेखन झाले . कलापथक देखील स्थापले त्यांनी 12 पटकथा विविध गाणी 35 कादंबऱ्या लिहिल्या त्यांच्या फकीर या कादंबरीस सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळालेला आहे.’ वारणेचा वाघ, चित्रा, रानगंगा, वैजयंता अशा कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. समाजामध्ये जाती विषयीची कटूता पाहून त्यांनी अनेक पथनाट ठेवलेले पोवाडे लिहिले व समाज जागृतीचे महान कार्य केले, साहित्यिक सुधारक, त्यांनी तमाशा ही केला. त्यांच्या पोवाड्यामुळे ते अधिक प्रसिद्ध झाले व लोकांनी त्यांना लोकशाहीर ही पदवी दिली.

त्यांच्या जीवनात दोन विवाह झाले कोंडाबाई व जयवंता ही पत्नींची नावे, व मधुकर शांता शकुंतला अपत्य. त्यांच्या कुशाग्र बुद्धीमुळे ते नावारूपास आले. त्यांचा मृत्यू १८जुलै १९६९ साली झाला. अशा या महान लेखकाला माझा पुन्हा एकदा प्रणाम.

सौ. ऋचा हनुमंत महाबळ,सहज सुचलं काव्यकुंज सदस्य सिंधुदुर्ग
……………………………………