• बल्लारपूर उपविभागामध्ये 1 ऑगस्टला महसूल दिन साजरा !
• 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट, 2025 या कालावधीतील महसूल सप्ताह्याचा थाटात शुभारंभ ”
चंद्रपूर किरण घाटे
आज दिनांक 01/08/2025 रोजी बल्लारपूर तहसि
ल कार्यालयाच्या सभागृहामध्ये 1 ऑगस्ट महसूल दिन साजरा करुन 1 ऑगस्ट ते 7 आगस्ट,2025 या कालावधीतील होणा-या कार्यक्रमाचा महसूल सप्ताहचा शुभारंभ करण्यात आला. सदरहु कार्यक्रमास बल्लारपूर तालुक्यातील मोठया प्रमाणात लाभार्थी तसेच नागरीक उपस्थित होते.
तसेच महसूल सप्ताहाची सुरुवात म्हणून आजचे महसूल दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात बल्लारपूर तालुक्यातील उपस्थित असलेल्या समस्त नागरिक व लाभार्थी यांना महसूल विभागाकडून राबविण्यात येणा-या विविध येजना तसेच महसूल सप्ताह निमित्त सात दिवस राबविण्यात येणारे विविध कार्यक्रमबाबत माहिती देण्यात आली.
महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी करिता “ आरोग्य तापासणी शिबीराचे ” आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच तालुक्यातील इतरही नागरीकांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घेतला.
आयोजित महसूल दिनात कार्यालयाकडून निर्गमीत करण्यात येणा-या विविध योजना सबंधातील लाभ जसे 26 लाभार्थी यांना शिधापत्रिका वाटप, 17 लाभार्थी यांना विविध प्रमाणपत्रे वाटप, 31जणांना संजय गांधी लाभ मंजुरी आदेश, तसेच मौजा चारवट येथील पुनर्वसित गावचे लाभार्थी यांना मोफत सातबारा वितरीत करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये महसूल प्रशासनाअंतर्गत पदाला नेमून दिलेल्या विविध क्षेत्रात एकदंरीत उत्कृष्ट केलेली कामगीरी व महसूल प्रशासनाला लोकभिमुक व गतीमान करण्याकरिता केलेल्या कामगीरीबद्दल बल्लारपूर तालुक्यातील सर्व संवर्ग निहाय अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
सदरहु कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशासनाकडून देण्यात येणा-या विविध योजना, शासन निर्णय, परिपत्रके तसेच महसूल विषयक नियमांची जागृती करण्याकरिता तहसिल कार्यालयाचे परिसरामध्ये नागरीकांना योजना अथवा अर्ज सहज करता यावा माहिती उपलब्ध असावी याकरिता पुढील 10 प्रकाराचे “भिंत्तीपत्रके” तयार करण्यात आली (शेतातील रस्ता / वहिवाट मार्ग,फेरफार, महाराजस्व अभियान, सलोखा योजना, अतिक्रमण नियमानुकूल, ई हक्क प्रणाली, लक्ष्मीमुक्ती योजना, महसूली वसुली,ई पीक पाहणी, ॲग्रीस्टॅक आदि)
सदरहू कार्यक्रमामध्ये महसूल सप्ताहामध्ये होणारे उपक्रम हे नागरीकांच्या फायद्याचे असून त्याचा सर्व बल्लारपूर उपविभागातील नागरीकांनी सक्रियतेने लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार रेणूका कोकाटे यांनी केले आयोजित उपक्रम यशस्वी होण्याच्या शुभेच्छा त्यांनी या वेळी सर्वांना दिल्या.
कार्यक्रमाला उपस्थित सर्व नागरिक तसेच अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


