Home Breaking News • निमकरांना नवी जबाबदारी, सहकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव • सहकारी बँकेत संचालकपदाची...

• निमकरांना नवी जबाबदारी, सहकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव • सहकारी बँकेत संचालकपदाची निवड; बाजार समितीपासून ग्रामपंचायतीपर्यंतचा उत्साह

238

• निमकरांना नवी जबाबदारी, सहकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

• सहकारी बँकेत संचालकपदाची निवड; बाजार समितीपासून ग्रामपंचायतीपर्यंतचा उत्साह

चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.

राजुरा : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार सुदर्शन निमकर यांची संचालकपदी निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. निमकर यांच्या कार्यशैलीचा, अनुभवाचा आणि सामाजिक जाणिवेचा पुनःश्च एकदा ठसा उमटवणारी ही निवड असल्याचे बोलले जात आहे.या निवडीच्या पार्श्वभूमीवर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ऍड. अरुण धोटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, नगर परिषदेचे माजी सभापती अरुणभाऊ मस्की, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय पावडे, चुनाळा ग्रामपंचायतीचे सरपंच बाळनाथ वडस्कर, प्राध्यापक बि. यू. बोर्डेवार, शिक्षक संघटनेचे नेते सुधाकर चंदनखेडे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.शुभेच्छा भेटीदरम्यान उपस्थित मान्यवरांनी निमकर यांच्याकडून ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी बँकिंग व्यवस्थेमार्फत ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली. विशेषतः शेतकरी, महिला बचतगट, स्वयंसहायता गट आणि लघुउद्योगांना सक्षम करण्याच्या दृष्टीने योजनाबद्ध उपक्रम राबवले जातील, असा विश्वासही त्यांनी दर्शविला.
माजी आमदार निमकर यांनी या भेटीबद्दल आभार मानत सहकार क्षेत्रात पारदर्शकता, कार्यक्षम व्यवस्थापन आणि ग्रामीण भागातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत वित्तीय सेवा पोहोचवण्याचे आपले ध्येय अधोरेखित केले.
या निमित्ताने निमकरांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सहकारी बँकेची नवी दिशा ठरेल का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.