Home Breaking News ⬜♥️⬜बेधुंद प्रेम ⬜♥️⬜

⬜♥️⬜बेधुंद प्रेम ⬜♥️⬜

183

⬜♥️⬜बेधुंद प्रेम ⬜♥️⬜

प्रेम हे सगळेजण करतात परंतु कुणी प्रेयसी किंवा प्रियकर प्रेमात पडतात त्यांना बाह्यजगाचा विसर पडतो….
बेधुंद प्रेम म्हणजे एकमेकांविषयीच्या प्रेमामुळे कुटुंबाचाही कधी विचार करीत नाही त्याचे शब्दाशब्दात प्रेम प्रगटते…
बेधुंद प्रेमवीर तो तिच्या रूपावर भाळलयं. एखाद्या बहरलेल्या बगीच्यासारखी ती सुंदर…. मनमोहक…. टवटवीत होती तिचाच ध्यास तिच्याच विचारांनी त्याच्या डोक्यात काहूर माजलं….
तिच्या सौंदर्यानी अक्षरशः मोहिनी घातली, किती म्हणून कौतुक करावे, तिची जणू चमकलेल्या विजेसारखी तेजस्वी नजर, गालावर रंगेल खळी,, तिची घायाळ चाल! तिच्या सहवासात बेहोष होवून विहार करणारा बेधुंद प्रेमवीर….
कसलाही विचार न करता जगणारा. परंतु खरं प्रेम करतांना समोरचं जाणून घेवून करावे, तसेच पोटाची खळगी भरून आयुष्यभर टिकणारं असावे. आपली संगत चुकली की आयुष्याची दिशा बदलते!!!

⬜🟧सौ. शैला चिमड्यालवार सहज सुचलं मार्गदर्शिका सावली